# अमंगळ, किळस, वीट ## व्याख्या: "किळस" या शब्दाचा वापर एखाद्याचा तिटकारा किंवा अत्यंत नापसंती दर्शवण्यासाठी केला जातो. * मिसरी लोकांना इब्री लोकांची किळस वाटत असे. याचा अर्थ असा मिसरी लोक इब्री लोकांस नापसंत करतात आणि त्यांच्याबरोबर सलग्न होत नाहीत किंवा त्यांच्या जवळ जात नाहीत. * पवित्र शास्त्रामध्ये म्हटले आहे की अशा काही गोष्टी आहेत "ज्याचा यहोवाला वीट येतो" यात खोटेपणा, गर्व, मानवांचा त्याग करणे, मूर्तींची उपासना करणे, हत्या करणे आणि व्यभिचार व समलैंगिकता यासारख्या लैंगिक पापांचा समावेश आहे. * शेवटल्या काळाविषयी आपल्या शिष्यांना शिकवताना, येशूने दानिएल संदेष्ट्याकडून झालेल्या भविष्यवाणीत "उजाडलेल्या गोष्टींची किळस" याविषयी सांगितले ज्यानी देवाच्या विरोधात बंड करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या उपासनेची जागा भ्रष्ट केली. ## भाषांतर सूचना * "किळस" या शब्दाचे भाषांतर "देवाला आवडत नसलेले काहीतरी" किंवा "किळसवाणी वस्तू" किंवा "तिरस्करणीय वागणूक" किंवा "अत्यंत वाईट कृती" असेही होऊ शकते. * संदर्भाच्या आधारावर, "किळस आहे" असे वाक्यांश अनुवादित करण्याच्या पद्धतींमध्ये "मोठ्या प्रमाणावर द्वेष केला जातो" किंवा "किळसवाणी आहे" किंवा "पूर्णपणे अस्वीकार्य आहे" किंवा "अत्यंत वीट आणणारी" असू शकते. * "उजाडलेल्या गोष्टींची किळस" या शब्दाचे भाषांतर "लोकांना मोठी दुखापत करणारी भ्रष्ट वस्तू" किंवा " मोठे दुःख देणारे अमंगळ कृत्य" म्हणून अनुवादित केले जाऊ शकते. (हेही पहाः [व्यभिचार](../kt/adultery.md), [भ्रष्ट](../other/desecrate.md), [उजाड](../other/desolate.md), [खोट्या देवता](../kt/falsegod.md), [अर्पण](../other/sacrifice.md)) ## पवित्र शास्त्रामधील संदर्भ: * [एज्रा 9:1-2](rc://*/tn/help/ezr/09/01) * [उत्पत्ति 46:33-34](rc://*/tn/help/gen/46/33) * [यशया 1:12-13](rc://*/tn/help/isa/01/12) * [मत्तय 24:15-18](rc://*/tn/help/mat/24/15) * [नीतिसूत्रे 26:24-26](rc://*/tn/help/pro/26/24) * Strong's: H887, H6292, H8251, H8262, H8263, H8441, G946