mr_tw/bible/other/word.md

3.5 KiB

वचन, वचने

व्याख्या:

"वचन" ह्याचा संदर्भ एखाद्या गोष्टीशी आहे, जी कोणीतरी सांगितली होती.

  • ह्याचे उदाहरण, हे असू शकते, जेंव्हा देवदूत जखऱ्याला बोलला, "तू माझ्या वचनांवर विश्वास ठेवला नाहीस" ह्याचा अर्थ, "मी जे काही बोललो, त्यावर तू विश्वास ठेवला नाहीस" असा होतो.
  • या शब्दाचा संदर्भ जवळजवळ नेहमीच संपूर्ण संदेशाशी असतो, फक्त एक शब्दाशी नसतो.
  • काहीवेळा "वचन" या शब्दाचा संदर्भ सामान्यपणे भाषणाशी येतो, जसे की "शब्द आणि कृत्यांमध्ये शक्तिशाली" ज्याचा अर्थ "वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये शक्तिशाली" असा होतो.
  • पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचदा "वचन" या शब्दाचा संदर्भ सर्वकाही जे देव बोलला किंवा त्याने आज्ञापिले, जसे की "देवाचे वचन" किंवा "सत्याचे वचन" या शब्दांमध्ये.
  • या शब्दाचा सर्वात विशेष उपयोग हा, जेंव्हा येशूला "वचन" म्हणून संबोधित कण्यात आले तो होता. शेवटच्या दोन शब्दांच्या अर्थासाठी, पहा देवाचे वचन

भाषांतर सूचना

  • "वचन" किंवा "वचने" ह्याचे भाषांतर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमध्ये, "शिक्षण" किंवा "संदेश" किंवा "वार्ता" किंवा "म्हणणे" किंवा "जे काही बोलले गेले" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: देवाचे वचन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: