mr_tw/bible/kt/wordofgod.md

9.4 KiB
Raw Permalink Blame History

देवाचे वचन, याहवेचे वचन, परमेश्वराचे वचन, सत्याचे वचन, शास्त्रवचन

व्याख्या:

पवित्र शास्त्र "देवाचा शब्द" या शब्दाचा अर्थ देवाने लोकांशी केलेल्या कोणत्याही संवादाच संदर्भ आहे. यामध्ये बोललेल्या आणि लिखित संदेशांचा समावेश आहे. येशूला "देवाचा शब्द" असे देखील म्हणतात.

  • "शास्त्रवचने"या शब्दाचा अर्थ "लेखन" असा आहे. हे फक्त नवीन करारामध्ये वापरले जाते आणि जुन्या करारातील, इब्री शास्त्रांचा संदर्भ देते. हे लिखाण देवाचे संदेश होते जे त्याने लोकांना लिहायला सांगितले होते जेणेकरून भविष्यात बरेच वर्षे लोक ते वाचू शकतील
  • संबंधित शब्द "याहवेचे वचन" आणि "परमेश्वराचे वचन" बहुतेकदा देवाच्या एखाद्या विशिष्ट संदेशाला संदर्भित करतो जो पवित्र शास्त्रातील संदेष्ट्याला किंवा इतर व्यक्तीला देण्यात आला होता.
  • कधीकधी ही संज्ञा फक्त "शब्द" किंवा "माझा शब्द" किंवा "तुझा शब्द" (देवाच्या शब्दाबद्दल बोलताना) अशी येते.
  • नवीन करारामध्ये येशूला "शब्द" आणि "देवाचा शब्द" असे म्हटले आहे. हे शिर्षकांचा अर्थ असा आहे की येशू कोण आहे हे तो पूर्णपणे प्रकट करतो, कारण तो स्वत: देव आहे.

"सत्याचा शब्द" ही संज्ञा "देवाचा शब्द" या संज्ञेला संदर्भित करण्याचा आणखी एक मार्ग आहे जी त्याचा संदेश किंवा अध्यापन आहे. हे फक्त एका शब्दाचा संदर्भ देत नाही.

  • देवाच्या सत्याच्या शब्दात देव स्वत: बद्दल, त्याच्या निर्मितीबद्दल आणि येशूद्वारे त्याच्या तारणाची योजना, याबद्दल शिकवलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
  • हा शब्द देवाने आपल्याला जे सांगितले ते सत्य, विश्वासू आणि वास्तविक आहे यावर जोर देते.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "याहवेचा संदेश" किंवा "देवाचा संदेश" किंवा "देवाकडून शिकवलेल्या गोष्टी” यांचा समावेश असू शकतो

  • काही भाषांमध्ये हा शब्द बहुवचन बनविणे आणि "देवाचे शब्द" किंवा "याहवेचे शब्द" असे म्हणणे अधिक नैसर्गिक असू शकते

  • "याहवेचे वचन आले" हा अविर्भाव अनेकदा देव आपल्या संदेष्ट्यांना किंवा आपल्या लोकांना सांगितलेल्या गोष्टीचा परिचय देण्यासाठी वापरला जातो. "याहवे हा संदेश बोलला" किंवा "याहवे ही वचने बोलला” असे त्याचे भाषांतर केले जाऊ शकते

  • "शास्त्रवचन" किंवा "शास्त्रवचने" या शब्दाचे भाषांतर "लिखाण" किंवा "देवाचे लेखी संदेश" असे केले जाऊ शकते. या शब्दाचे भाषांतर "शब्द" या शब्दाच्या अनुवादापेक्षा वेगळे केले पाहिजे.

  • जेव्हा "शब्द" एकटाच येतो आणि तो देवाच्या शब्दाचा संदर्भ घेतो तेव्हा त्याचे भाषांतर "संदेश" किंवा "देवाचे वचन" किंवा "शिकवणी" असे केले जाऊ शकते. वर सुचविलेल्या वैकल्पिक भाषांतरांचा देखील विचार करा.

  • जेव्हा पवित्र शास्त्र येशूला "शब्द" म्हणून संबोधते तेव्हा या शब्दाचे भाषांतर "संदेश" किंवा "सत्य" म्हणून केले जाऊ शकते

  • "सत्याचे वचन" या संज्ञचे भाषांतर "देवाचा खरा संदेश" किंवा "देवाचे वचन, जे खरे आहे" असे म्हणून केले जाऊ शकते.

  • या शब्दाच्या भाषांतरात खरा अर्थ समाविष्ट करणे महत्वाचे आहे.

(हे देखील पाहा: [संदेष्टा], [खरे], [याहवे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [उत्पत्ति 15:01]
  • [1 राजे 13:01]
  • [यिर्मया 36: 1-3]
  • [लुक 08:11]
  • [योहान 05:39]
  • [प्रेषितांचे कृत्ये 06:02]
  • [प्रेषितांचे कृत्ये12:24]
  • [रोमकरांस पत्र 01:02]
  • [2 करिंथकरांस पत्र 06:07]
  • [इफिसकरांस पत्र 01:13]
  • [2 तीमथ्याला पत्र 03:16]
  • [याकोब 01:18]
  • [याकोब 02: 8-9]

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • [25:07] देवाच्या वचनात तो आपल्या लोकांना आज्ञा देतो, ‘केवळ आपला देव परमेश्वर याची उपासना करा आणि त्याचीच सेवा करा.
  • [33:06] म्हणून येशूने स्पष्ट केले, "बी हे __ देवाचे वचन आहे__.
  • [42:03] मग येशूने त्यांना देवाचे वचन_ मसीहाबद्दल काय सांगते ते समजावून सांगितले.
  • [42:07] येशू म्हणाला, "मी तुला सांगितले होते की माझ्याबद्दल देवाच्या वचनात_ जे लिहिले आहे ते सर्व गोष्टी पूर्ण झाले पाहिजे." मग त्याने त्यांची मने उघडली जेणेकरुन त्यांना __ देवाचे वचन__ समजावे.
  • [45:10] फिलिप्पाने देखील येशूची चांगली बातमी सांगण्यासाठी इतर शास्त्रवचनांचा उपयोग केला.
  • [48:12] परंतू येशू हा सर्वांचा महान संदेष्टा आहे. तो देवाचा शब्द आहे.
  • [49:18] देव तुम्हाला प्रार्थना करण्यास, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास, आणि इतर विश्वासणाऱ्या बरोबर त्याची उपासना करण्यास सांगतो आणि त्याने आपल्यासाठी काय केले ते इतरांना कळविण्यास सांगतो.

शब्द संख्या

  • स्ट्रॉन्गचे: एच 561, एच 565, एच 1697, एच 3068, जी 3056, जी 4487