mr_tw/bible/other/well.md

5.1 KiB

कुंड, पाण्याची टाकी, विहीर, विहिरी

व्याख्या:

पवित्र शास्त्राच्या काळात "विहीर" आणि "कुंड" हे शब्द, पाण्याच्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रोतांना संदर्भित करतात.

  • एक विहिर जमिनीत खोदलेले एक खोल भोक आहे, ज्यामुळे भूमिगत पाण्याचा प्रवाह त्यात वाहून गोळा होऊ शकतो.
  • एक कुंड म्हणजे दगडामध्ये एक खोल खड्डा खड्डा खणला जातो, ज्याचा पावसाचे गोळा केलेले पाणी धरून ठेण्यासाठी उपयोग होतो.
  • टाकी सामान्यतः दगडामध्ये खोदली जाते आणि त्यामध्ये पाणी ठेवण्यासाठी, त्याला गीलाव्याने बंद केले जाते. एक "टाकी तुटते" ज्यावेळी त्याला केलेला गिलावा तडकतो आणि त्यातून पाणी गळण्यास सुरवात होते.
  • छपरावरून वाहत आलेले पाणी साठवण्यासाठी, सहसा टाक्या लोकांच्या घरातील अंगणामध्ये स्थित असत.
  • विहिरी बहुतेकवेळा अशा ठिकाणी स्थित होत्या, जेथे त्यात अनेक कुटुंबांना किंवा संपूर्ण समुदायाद्वारे प्रवेश करता येऊ शकतो.
  • विहिरीचा वापर करण्याच्या अधिकारामध्ये अनेकदा भांडणे आणि संघर्षाचे कारण होते, कारण पाणी हे गुरेढोरे आणि माणसे दोघांसाठी अत्यंत महत्वाचे होते.
  • विहीर आणि टाकी ह्यामध्ये काहीतरी पडण्यापासून वाचवण्यासाठी दोन्हींना सहसा मोठ्या दगडाने झाकले जात असे. सहसा पाणी पृष्ठभागावर आणण्यासाठी, तेथे एका बदलीला किंवा भांड्याला रस्सी बांधून ठेवलेली होती.
  • काहीवेळा कोरड्या टाकीचा उपयोग एखाद्याला कैदेत ठेवण्यासाठी केला जात असे, जसे की, योसेफ आणि यिर्मयासोबत घडलेले.

भाषांतर सूचना

  • "विहीर" भाषांतरित करण्याच्या पद्धतींमध्ये "खोल पाण्याचे भोक" किंवा "उगवत्या पाण्याचे खोल भोक" किंवा "पाणी काढण्याचे खोल भोक" असे केले जाऊ शकते.
  • "टाकी" या शब्दाचे भाषांतर "दगडातील पाण्याचा खड्डा" किंवा "पाण्याचा खोल आणि अरुंद खड्डा" किंवा "पाणी धरून ठेवण्यासाठी जमिनीखालील टाकी" असे केले जाऊ शकते.
  • या संज्ञाच्या अर्थामध्ये खूपच साम्य आहे. महत्वाचा फरक हा आहे की, जमिनीखालील उगमामुळे विहिरीला पाण्याचा सततचा पुरवठा आहे, तर कुंड हा एक पाणी धरून ठेवण्याची टाकी आहे ज्यामध्ये पाणी सहसा पावसाद्वारे येते.

(हे सुद्धा पहा: यिर्मया, तुरुंग, भांडण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: