mr_tw/bible/other/torment.md

3.0 KiB

पीडा देणे (सतवने), पीडिले, पीडा (त्रास), पिडणारे

तथ्य:

"पीडा देणे" या शब्दाचा संदर्भ भयंकर त्रासाशी येतो. एखाद्याला पीडा देणे ह्याचा अर्थ, त्या व्यक्तीला बऱ्याचदा क्रूर पद्धतीने त्रास देण्याशी येतो.

  • काहीवेळा "पीडा देणे" या शब्दाचा संदर्भ शारीरिक वेदना किंवा त्रासाशी येतो. उदाहरणार्थ, प्रकटीकरणाच्या पुस्तकात शारीरिक पीडा देण्याचे वर्णन केले आहे, ज्याचा त्रास "पशूंची" उपासना करणाऱ्या उपासकांना शेवटच्या काळात होईल.
  • ईयोबाच्या अनुभवाप्रमाणे, त्रास हा देखील आध्यात्मिक आणि भावनिक वेदनेचे स्वरूप असू शकतो.
  • प्रकटीकरणाच्या पुस्तकात, प्रेषित योहान असे लिहितो की, जे लोक येशूचा त्याचा तारणारा म्हणून स्वीकार करत नाहीत, ते लोक सार्वकालिक पिडेसाठी अग्नीच्या सरोवरात टाकले जातील.
  • या शब्दाचे भाषांतर "भयंकर त्रास" किंवा "एखाद्याला अतिशय त्रासास कारणीभूत होणे" किंवा "क्लेश" असे केले जाऊ शकते. काही भाषांतर करणारे, स्पष्ट करण्यासाठी कदाचित "शारीरिक" किंवा "आत्मिक" असा शब्द जोडू शकतात.

(हे सुद्धा पहा: पशु, सार्वकालिक, ईयोब, तारणारा, आत्मा, त्रास, उपासना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: