mr_tw/bible/other/thresh.md

2.8 KiB

मळणी करणे, मळणी केली, मळणी

व्याख्या:

"मळणी करणे" आणि "मळणी" या शब्दाचा संदर्भ गव्हाच्या दाण्याला गव्हाच्या वनस्पतीपासून वेगळे करण्याच्या पद्धतीचा पहिला भाग आहे.

  • गव्हाच्या वनस्पतीची मळणी करण्याने, त्याचे दाणे कडीतून आणि भुसकटापासून मोकळे होतात. त्यानंतर धान्याला नको असलेल्या सर्व वस्तूंपासून वेगळे करण्यासाठी "उफणले" जाते, आणि मागे खाण्यायोग्य धान्य राहते.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, "खळे" हा एक मोठा सपाट दगड किंवा माती घट्ट बसवलेला कठीण पृष्ठभाग होता, ज्यावर धान्याच्या कड्यांना चिरडून त्याच्यातून धान्य काढले जात होते.
  • काहीवेळा "मळणीची गाडी" किंवा "मळणीचे चाक" ह्याचा उपयोग धान्य चिरडण्यासाठी आणि त्याला काडीपासून आणि भुसकटापासून वेगळे करण्यात मदत करण्यासाठी केला जातो.
  • "मळणीचा घन" किंवा "खळगे" ह्यांचा सुद्धा उपयोग धान्य वेगळे करण्यासाठी केला जात होता. ह्याला लाकडी फळीपासून बनवले होते, ज्याच्या एका टोकाला धातूचे तीक्ष्ण टोक होते.

(हे सुद्धा पहा: भूसकट, धान्य, उफाणणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: