mr_tw/bible/other/terror.md

3.2 KiB

दहशत, दहशत घालणे, दहशत घातली, भयप्रद, घाबरवणे, घाबराहट, भीतीदायक

व्याख्या:

"दहशत" या शब्दाचा संदर्भ अत्यंत भीतीची भावनेशी येतो. एखाद्याला "घाबरवणे" ह्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या अत्यंत भीतीच्या भावनेस कारणीभूत होणे असा होतो.

  • एक "दहशत" ही असे काहीतरी किंवा कोणीतरी आहे, जो अत्यंत भीती वाटण्यास किंवा खूप भीती होण्यास कारणीभूत होतो. दहशतीचे उदाहरण कदाचित हल्ला करणारे सैन्य, किंवा पीडा किंवा रोगराई जी सर्वत्र पसरते आणि अनेक लोकांना मारते.
  • या दहशतींचे "भीतीदायक" असे वर्णन केले जाते. * या शब्दाचे भाषांतर, "भीतीस कारणीभूत होणारा" किंवा "दहशत निर्माण करणारा" असे केले जाऊ शकते.
  • एके दिवशी देवाचा न्याय पश्चात्ताप न करणाऱ्या लोकांच्यामध्ये ज्यांनी त्याच्या दयेला नाकारले, त्यांच्यात दहशत निर्माण करेल.
  • "यहोवाची दहशत" ह्याचे भाषांतर "यहोवाची भीतीदायक उपिस्थिती" किंवा "यहोवाचा भयानक न्याय" किंवा "जेंव्हा यहोवा अतिशय भितीस कारणीभूत होईल" असे केले जाऊ शकते.
  • "दहशत" या शब्दाचे भाषांतर करण्यामध्ये, "अतिशय भीती" किंवा "गंभीर भीती" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: प्रतिस्पर्धी, भीती, न्यायाधीश, पीडा, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: