mr_tw/bible/other/tent.md

3.4 KiB

तंबू, तंबूत, तंबू बनवणारे

व्याख्या:

एक तंबू हा सहज हातातून नेण्याजोगे येणारा निवारा आहे, जो मजबूत कापड खांबांच्या रचनेवरून झाकून त्याला जोडून बनवला जातो.

  • तंबू हे काही थोडक्या लोकांना झोपण्यापुरत्या जागेसह छोटे असू शकतात, किंवा ते इतके मोठे असू शकतात की, संपूर्ण कुटुंब त्यामध्ये झोपू शकते, जेवण बनवू शकते आणि राहू शकते.
  • अनेक लोकांसाठी, तंबूचा उपयोग कायमचे राहण्याचे स्थान म्हणून केला जतो. उदाहरणार्थ, कनान देशात राहण्याच्या वेळी, बऱ्याचदा अब्राहमाचे कुटुंब शेळ्यांच्या केसापासून बनवलेल्या मजबूत कापडापासून बांधलेल्या मोठ्या तंबूमध्ये राहिले.
  • सिनायच्या वाळवंटात भटकत असताना, चाळीस वर्षांच्या काळात, इस्राएल लोकसुद्धा तंबूमध्ये राहिले.
  • निवासमंडपाची इमारत ही कापडाच्या पडद्यांपासून बनवलेली जड भिंतींची एक प्रकारचा मोठा तंबू होती.
  • जेंव्हा प्रेषित पौल सुवार्ता सांगण्यासाठी वेगवेगळ्या शहरातून फिरला, तेंव्हा त्याने स्वतःला आधार देण्यासाठी तंबू बनवले.
  • काहीवेळा "तंबू" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने सामान्यपणे जिथे लोक राहतात त्याच्या संदर्भासाठी केला जातो. ह्याचे भाषांतर "घर" किंवा "निवासस्थान" किंवा "घर" किंवा "शरीरेसुद्धा" असे केले जाऊ शकते.

( हे सुद्धा पहा: अब्राहम, कनान, पडदा, पौल, सिनाय, निवासमंडप, मिलापवाला तंबू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: