mr_tw/bible/other/stumble.md

3.7 KiB

अडखळणे, अडखळला, अडखळण्याचा (अडखळत)

व्याख्या:

"अडखळणे" या शब्दाचा अर्थ जेंव्हा चालत किंवा धावत असतो त्यावेळी "जवळजवळ पडणे" असा होतो. सहसा ह्यात कश्याला तरी ठोकरण्याचा समावेश होतो.

  • लाक्षणिक अर्थाने, "अडखळणे" ह्याचा अर्थ "पाप करणे" किंवा विश्वास ठेवण्यामध्ये "डगमगणे" असा होतो.
  • या शब्दाचा संदर्भ, जेंव्हा युद्ध लढत असतो, किंवा जेंव्हा छळ किंवा शिक्षा होत असते, तेंव्हा डगमगण्याशी किंवा कमजोरी दाखवण्याशी येतो.

भाषांतर सूचना

  • जेंव्हा "अडखळणे" या शब्दाचा अर्थ शारीरिकदृष्ट्या कश्यालातरी ठोकरणे, ह्याच्या संदर्भात येतो, तेंव्हा त्याचे भाषांतर "जवळजवळ पडणे" किंवा "ची ठोकर लागणे" अशा शब्दाच्या अर्थाने केला जाऊ शकतो.
  • जर हा शब्द त्या संदर्भाचा अचूक अर्थ संवादित करत असेल तर, या शब्दाच्या शब्दशः अर्थाचा उपयोग लाक्षणिक संदर्भात सुद्धा केला जाऊ शकतो.
  • लाक्षणिक उपयोग करताना, जेंव्हा या शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकल्पित भाषेत काही तारतम्य आणत नसेल तर, "अडखळणे" या शब्दाचे भाषांतर, "पाप" किंवा "डगमगता" किंवा "विश्वास ठेवण्याचे थांबवणे" किंवा "कमजोर पडणे" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याचा इतर मार्ग "पाप करून अडखळणे" किंवा "विश्वास न ठेवल्यामुळे अडखळे" असा होऊ शकतो.
  • "अडखळण्यासाठी बनवले" ह्याचे भाषांतर "कमजोर बनण्यास कारणीभूत झाला" किंवा "डगमगण्यास कारणीभूत झाला" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: विश्वास, छळ, पाप, अडखळण्याचा खडक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: