mr_tw/bible/other/sorcery.md

3.7 KiB

मांत्रिक (जादुगार), चेटकीण, जादूगिरी (जादूचे प्रयोग), जादूटोणा

व्याख्या:

"जादुगिरी" किंवा "जादूटोणा" या शब्दांचा संदर्भ, जादुंचा उपयोग करण्याशी येतो, ज्यामध्ये दुष्ट आत्म्यांच्या मदतीने सामर्थ्यवान गोष्टी करण्याचा समावेश होतो. एक "मांत्रिक" हा असा कोणीतरी आहे, जो या सामर्थ्यवान, जादूच्या गोष्टी करतो.

  • जादूचा आणि जादिगिरीच्या उपयोगामध्ये, फायदेशीर गोष्टी (जसे की, एखाद्याला बरे करणे) आणि हानिकारक गोष्टी (जसे की, एखाद्यावर श्राप सोडणे) या दोन्हींचा समावेश होतो. परंतु सर्व प्रकारचा जादूटोणा चुकीचा आहे, कारण त्याच्यामध्ये दुष्ट शक्तींचा उपयोग केला जातो.

पवित्र शास्त्रामध्ये, देव सांगतो की, जादूगिरी ही इतर पापांसारखीच (जसे की, व्याभिचार, मूर्तींची उपासना, आणि बालकांचे अर्पण) दुष्ट आहे.

  • "जादुगिरी" आणि "जादूटोणा" या शब्दाचे भाषांतर "दुष्ट आत्मिक शक्ती" किंवा "मंत्र सोडणे" असेही केले जाऊ शकते.
  • "मांत्रिक" ह्याचे भाषांतर करण्याच्या शक्य पद्धतींमध्ये, "जादूचे काम करणारा" किंवा "असा व्यक्ती जो मंत्र सोडतो" किंवा "दुष्ट आत्मिक शक्तींना वापरून चमत्कार करणारा व्यक्ती" ह्यांचा समावेश होतो.
  • "जादुगिरी" ह्याचा अर्थ, "शकून सांगणे" ज्यांचा संदर्भ आत्मिक जगताशी संपर्क साधण्याशी येतो, ह्याच्या अर्थापेक्षा वेगळा आहे, ह्याची नोंद घ्या.

(हे सुद्धा पहा: व्यभिचार, भुत, शकून सांगणे, खोटे देव, जादू. बलिदान, उपासना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: