mr_tw/bible/other/divination.md

3.6 KiB

शकून, दैवी शक्ती पाहणारा (मांत्रिक), दैवीप्रश्न, जादूटोणा करणारा

व्याख्या:

"शकून" आणि दैवीप्रश्न" या शब्दांचा संदर्भ अलौकिक जगामध्ये असलेल्या आत्म्यांकडून माहिती मिळवण्याच्या प्रयत्नाच्या सरावाशी येतो. जो व्यक्ती असे करतो, त्याला काहीवेळा "मांत्रिक" किंवा "जादूटोणा करणारा" असे म्हंटले जाते.

  • जुन्या कराराच्या काळात, देवाने इस्राएली लोकांना तुम्ही शकून किंवा दैवीप्रश्न पाहू नका अशी आज्ञा दिली होती.
  • देवाने त्याच्या लोकांना उरीम आणि थुम्मीम ह्यांचा उपयोग करून माहिती शोधण्याची परवानगी दिली होती, हे दगड होते, ज्यांना त्या हेतूसाठी महायाजाकाकडून वापरण्यासाठी तयार करण्यात आले होते. पण देवाने त्याच्या लोकांना दुष्ट आत्म्याच्या मदतीने माहिती शोधण्याची परवानगी दिलेली नव्हती.
  • मूर्तिपूजक मांत्रिकांनी आत्मिक जगतातून माहिती शोधण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग केला. काहीवेळा ते मृत प्राण्यांच्या आतील भागांचे परीक्षण करतात किंवा जमिनीवर पशूंचे हाड फेकून देतात, ते असे नमुने शोधत आहेत की, ते त्यांच्या खोटी देवांच्या संदेशाचे अर्थ लावतील.
  • नवीन करारामध्ये, येशू आणि त्याच्या शिष्यांनी सुद्धा शकून, चेटूक, जादू-टोणा, आणि जादू ह्यांना नाकारले. या सर्व सारावांमध्ये दुष्ट शक्तींच्या उपयोगाचा समावेश होतो, आणि देवाने त्या निषिद्ध ठरविल्या आहेत.

(हे सुद्धा पहा: प्रेषित, खोटे देव, जादू, चेटूक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: