mr_tw/bible/other/prince.md

5.1 KiB

राजकुमार, राजकुमारांनी, राजकुमारी, राजकुमाऱ्या

व्याख्या:

एक "राजकुमार" हा राजाचा मुलगा आहे. "राजकुमारी" ही राजाची मुलगी आहे.

  • "राजकुमार" या शब्दाचा सहसा लाक्षणिक अर्थाने एखाद्या पुढाऱ्याला, शासकाला, किंवा इतर प्रबळ व्यक्तीला संदर्भित करण्यासाठी उपयोग केला आहे.
  • अब्राहमाच्या संपत्ती आणि प्रभावामुळे, तो ज्या हित्ती लोकांच्यामध्ये राहत होता, त्यांनी त्याला "राजकुमार" म्हणून संदर्भित केले.
  • दनीएलच्या पुस्तकात, "राजकुमार" या शब्दाचा उपयोग "परसाचा राजकुमार" आणि "ग्रीसचा राजकुमार" या अभिव्य्क्तींमध्ये करण्यात आला, जे त्या संदर्भात कदाचित प्रबळ दुष्ट आत्म्यांचा उल्लेख करतात, ज्यांच्याकडे त्या प्रांतावर अधिकार होता.
  • मुख्य देवदूत मिखाएल ह्याला सुद्धा दनिएलच्या पुस्तकात "राजकुमार" म्हणून संदर्भित केलें आहे.
  • काहीवेळा पवित्र शास्त्रामध्ये सैतानाला "या जगाचा राजकुमार" म्हणून संदर्भित केले आहे.
  • येशूला "शांतीचा राजकुमार" आणि "जीवनाचा राजकुमार" असे संबोधण्यात आले आहे.
  • "प्रभु" आणि "राजकुमार" ह्यातील समांतर अर्थ दाखवण्यासाठी, प्रेषितांची कृत्ये 2:36 मध्ये येशूला "प्रभु आणि ख्रिस्त" म्हणून संदर्भित करण्यात आले आहे, आणि प्रेषितांची कृत्ये 5:31 मध्ये त्याला "राजकुमार आणि तारणारा" असे संदर्भित केले आहे.

भाषांतर सूचना

  • "राजकुमार" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "राजाचा मुलगा" किंवा "शासक" किंवा "पुढारी" किंवा "अधिपती" किंवा "प्रमुख पुढारी" ह्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
  • जेंव्हा देवदुताना संदर्भित केले जाते, तेंव्हा त्याचे भाषांतर "शासन करणारा आत्मा" किंवा "नेतृत्व करणारा देवदूत" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा शैतान किंवा इतर दुष्ट आत्म्यांना संदर्भित केले जाते, तेंव्हा या शब्दाचे भाषांतर "दुष्ट आत्म्यांचा शासक" किंवा "प्रबळ आत्मिक पुढारी" किंवा "आधिपत्य करणारा आत्मा" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: देवदूत, अधिकार, ख्रिस्त, शैतान, प्रभु, ताकद, शासक, शैतान, तारणारा, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: