mr_tw/bible/other/pledge.md

2.5 KiB

गहाण ठेवणे, मान्य केले, गहाण वस्तू

व्याख्या:

"गहाण ठेवणे" ह्याचा संदर्भ, औपचारीरीतीने आणि स्वच्छेने एखादी गोष्ट करण्याचे किंवा देण्याचे वचन देण्याशी येतो.

  • जुन्या करारात इस्राएली अधिकाऱ्यांनी दावीद राजाशी विश्वसनीय राहण्याचे मान्य केले.
  • जी वस्तू गहाण म्हणून ठेवली असेल, तिला त्याच्या मालकाला परत द्यावी लागे, जेंव्हा त्याने दिलेले वचन पूर्ण होत असे.
  • "गहाण ठेवणे" ह्याचे भाषांतर "औपचारिकपाणे ताब्यात देणे" किंवा "जोरदारपणे वचन देणे" असे केले जाऊ शकते.
  • "गहाण ठेवणे' या शब्दाचा संदर्भ वास्तूशी देखील येतो, जीला कर्ज परत केले जाईल ह्याची हमी म्हणून किंवा वचन म्हणून दिले जाते.
  • "गहाण ठेवणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "स्वच्छेने दिलेले वचन" किंवा "औपचारिक वचनबद्धता" किंवा "हमी" किंवा "औपचारिक खात्री" ह्यांचा समावेश संदर्भाच्या आधारावर होतो.

(हे सुद्धा पहा: वचन, शपथ, नवस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: