41 lines
5.4 KiB
Markdown
41 lines
5.4 KiB
Markdown
# शांती, शांत, शांतता प्रस्थापित करणारा
|
|
|
|
## व्याख्या:
|
|
|
|
"शांती" या शब्दाचा अर्थ असा आहे की संघर्ष किंवा चिंता, किंवा भीती नसल्याची भावना. "शांत" असलेल्या व्यक्तीला सुखरुप आणि सुरक्षित असल्यास स्थिर आणि आश्वासित वाटते.
|
|
|
|
* जुन्या करारामध्ये, "शांती" या शब्दाचा अर्थ बहुधा एखाद्या व्यक्तीचे कल्याण, निरोगीपणा किंवा संपूर्णपणाची सामान्य भावना असते.
|
|
* "शांती" हा शब्दा अशा काळाचा देखील संदर्भ घेऊ शकतो जेव्हा लोकांचा समुह किंवा देश एकमेकांशी भांडत नाहीत. या लोकांचे "शांततापूर्ण संबंध" असल्याचे म्हटले जाते.
|
|
* एखाद्या व्यक्तीशी किंवा लोकांच्या समूहाशी "शांती बनवणे" म्हणजे लढाई थांबविण्याकरिता कारवाई करणे होय.
|
|
* एक "शांती प्रस्थापित करणारा" असा व्यक्ती आहे जो लोकांना एकमेकांशी शांततेत जगण्यासाठी प्रभावित करण्यासाठी गोष्टी करतो आणि सांगतो.
|
|
* इतर लोकांशी "शांततेत" असणे म्हणजे त्या लोकांविरुद्ध लढा न देण्याच्या स्थितीत असणे.
|
|
* जेव्हा देव लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवितो तेव्हा देव आणि लोक यांच्यात चांगले किंवा योग्य नाते असते. याला "देवाची शांती" असे म्हणतात.
|
|
* "कृपा आणि शांती" हे अभिवादन प्रेषितांनी त्यांच्या सह विश्वासणाऱ्यांसाठी त्यांच्या पत्रांमध्ये आशीर्वाद म्हणून वापरले आहे.
|
|
* "शांती" या शब्दाचा अर्थ इतर लोकांशी किंवा देवाशी चांगला संबंध असणे असा देखील होऊ शकतो.
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 05: 1-3]
|
|
* [प्रेषितांचे कृत्ये 07:26]
|
|
* [कलस्सैकरांस पत्र 01: 18-20]
|
|
* [कलस्सैकरांस पत्र 03:15]
|
|
* [गलतीकरांस पत्र 05:23]
|
|
* [लुक 07:50]
|
|
* [लुक 12:51]
|
|
* [मार्क 04:39]
|
|
* [मत्तय 05:09]
|
|
* [मत्तय 10:13]
|
|
|
|
## पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:
|
|
|
|
* __[15:06]__ देवाने इस्राएल लोकांना कनानातील कोणत्याही लोकांशी __शांतीचा__ करार न करण्याची आज्ञा दिली होती.
|
|
* __[15:12]__ मग देवाने सर्व सीमेबरोबर इस्राएलास __शांती__ दिली.
|
|
* __[16:03]__ मग देवाने एक सुटका करणारा दिला ज्याने त्यांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले आणि देशास__शांती__आणली.
|
|
* __[21:13]__ इतर लोकांच्या पापाची शिक्षा भोगण्यास तो (मसीहा) मरणार. त्याने घेतलेली शिक्षा देव आणि लोक यांच्यात __शांती__ आणेल.
|
|
* __[48:14]__ दाविद हा इस्राएलाचा राजा होता, परंतु येशू संपूर्ण विश्वाचा राजा आहे! तो परत येईल आणि त्याच्या राज्यावर न्यायाने आणि __शांतीने__ कायमचा राज्य करील.
|
|
* __[50:17]__ येशू आपल्या राज्यात __शांतीने__ आणि न्यायाने राज्य करील, आणि तो आपल्या लोकांबरोबर कायमचा राहील.
|
|
|
|
## शब्द संख्या:
|
|
|
|
* स्ट्रॉन्गचे: H5117, H7961, H7962, H7965, H799, H8001, H8002, H8003, H8252, G2514, G1515, G1516, G1518, G1518, G222
|