mr_tw/bible/other/haughty.md

2.1 KiB

गर्विष्ठ

व्याख्या:

"गर्विष्ठ" या शब्दाचा अर्थ अहंकारी किंवा उद्धटपणे वागणारा असा होतो. जो "गर्विष्ठ" आहे तो स्वतःला खूप उंच असा कोणीतरी समजतो.

  • बऱ्याचदा हा शब्द एक अभिमानी व्यक्तीचे वर्णन करतो, जो देवाच्या विरुध्द पाप करीत राहतो.
  • सामान्यत: एक गर्विष्ठ व्यक्ती स्वतःबद्दल बढाई मारत असतो.
  • एक गर्विष्ठ मनुष्य हा मूर्ख असतो, शहाणा नसतो.
  • या शब्दाचे भाषांतर "अहंकार" किंवा "उद्धट" किंवा "स्वकेंद्रित" असे देखील केले जाऊ शकते.
  • "गर्विष्ठ दृष्टी" या लाक्षणिक अर्थाच्या अभिव्यक्तीचे भाषांतर "अहंकारी पद्धतीने बघणे" किंवा "दुसऱ्याकडे तो कमी महत्वाचा आहे असे बघणे" किंवा "घमंडी मनुष्य जो दुसऱ्यांना खाली बघतो" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: बढाई, अभिमान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: