mr_tw/bible/other/firstfruit.md

3.6 KiB

प्रथमफळ

व्याख्या:

"प्रथमफळ" या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रत्येक कापणीच्या हंगामातील फळ आणि भाजीपाल्याच्या पहिल्या पिकाचा एक भाग होय.

  • इस्राएली लोकांनी देवाला ही प्रथमफळे याज्ञासंबंधीचे अर्पण म्हणून अर्पण केली.
  • पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने पहिला जन्मलेला मुलगा, कुटुंबाचे प्रथमफळ असे होईल हे संदर्भित करण्यासाठी देखील केला आहे. ह्याचा अर्थ, त्या कुटुंबात जन्माला येणारा तो पहिला मुलगा असल्यामुळे, त्या कुटुंबाचे नाव आणि सन्मान पुढे नेणारा तोच होता.
  • कारण येशू मरणातून उठला, म्हणून त्याला त्याच्या विश्वासानाऱ्यांचे "प्रथमफळ" असे म्हंटले गेले आहे, विश्वासू जे मेलेले आहेत, पण ते एक दिवस जीवनात परत येतील.
  • ज्यांना येशूने सोडवले आणि त्याचे लोक होण्याकरिता बोलवले, त्यांना त्याने एक विशेष अधिकार आणि स्थान दिलेले आहे हे दर्शवण्यासाठी, येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना सर्व उत्पत्तीचे "प्रथमफळ" असेही म्हंटले जाते.

भाषांतर सूचना

  • या शब्दाच्या प्रत्यक्षात उपयोगाचे भाषांतर "पहिला भाग (पिकांचा) किंवा "कापणीचा पहिला भाग" असे केले जाऊ शकते.
  • शक्य असल्यास, भिन्न संदर्भांमध्ये भिन्न अर्थ मान्य करण्यासाठी लाक्षणिक वापराचे शब्दशः भाषांतर करणे आवश्यक आहे. हे शब्दशः अर्थ आणि लाक्षणिक उपयोगांमधील परस्परसंबंध दर्शवेल.

(हे सुद्धा पहा: प्रथम जन्मलेले)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: