mr_tw/bible/other/firstborn.md

4.6 KiB

ज्येष्ठ (प्रथम जन्मलेला)

व्याख्या:

"ज्येष्ठ" या शब्दाचा संदर्भ लोकांच्या किंवा प्राण्यांच्या संतती ह्याबद्दल येतो, बाकी इतर संततीचा जन्म होण्याच्या आधी पहिल्यांदा जन्मलेली असते.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "ज्येष्ठ" ह्याचा संदर्भ सहसा प्रथम जन्मलेली पुरुष संतती ह्याबद्दल येतो.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, प्रथम जन्मलेल्या पुत्राला उच्च स्थान दिले जायचे आणि त्याला कौटुंबिक वतनातील इतर पुत्रांपेक्षा दुप्पट वाटा मिळत असे.
  • सहसा देवाला बलिदान करण्याच्या प्राण्यांमध्ये, प्रथम जन्मलेल्या नराचे अर्पण केले जात होते.
  • ही संकल्पना लाक्षणिक अर्थाने वापरली जाऊ शकते. उदाहरणार्थ, इस्राएल राष्ट्राला देवाचा ज्येष्ठ पुत्र असे संबोधले जाते, कारण देवाने त्याला इतर राष्ट्रांपासून विशेषाधिकार दिलेले आहेत.
  • देवाचा पुत्र, येशू, ह्याला देवाचा ज्येष्ठ मुलगा असे संबोधले आहे, कारण इतरांवर असलेला त्याचा प्रभाव आणि अधिकार.

भाषांतर सूचना

  • जेंव्हा "प्रथम जन्मलेला" हा एकटा शब्द मजकुरामध्ये आढळतो, तेंव्हा त्याचे भाषांतर "प्रथम जन्मलेला पुरुष" किंवा "प्रथम जन्मलेला मुलगा" असे केले जाऊ शकते, कारण ते असेच ध्वनित होते. (पाहा: गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती)
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "प्रथम जन्मलेला मुलगा" किंवा "सर्वात मोठा मुलगा" किंवा "पहिल्या नंबरचा मुलगा" यांचा समावेश होतो.
  • जेंव्हा हा शब्द येशुसाठी लाक्षणिक अर्थाने वापरला जातो, तेंव्हा ह्याचे भाषांतर "सर्वावर अधिकार असलेला मुलगा" किंवा "प्रथम पुत्राचा सन्मान असलेला मुलगा" या अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • सूचना: येशूच्या संदर्भातील या संज्ञेचे भाषांतर त्यानेच हे जग निर्माण केले असे सूचित करत नाही हे सुनिश्चित करा.

(हे सुद्धा पहा: वतन (वारसा), बलिदान, मुलगा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: