mr_tw/bible/other/fellowshipoffering.md

2.5 KiB

शांत्यर्पण

तथ्य:

जुन्या करारात, "शांत्यर्पण" हे अशा प्रकारचे बलिदान होते, याला विविध कारणांसाठी अर्पण करण्यात येत होते, जसे की, देवाचे आभार मानण्यासाठी किंवा नवस पूर्ण करण्यासाठी.

  • या अर्पनामध्ये बलिदान करण्यासाठी जो प्राणी गरजेचा होता, तो नर किंवा मादी कोणताही चालत होता. हे होमार्पण, ज्यामध्ये नर प्राण्याचे बलिदान करणे गरजेचे होते, त्यापेक्षा वेगळे होते.
  • देवाला बलिदानाचा भाग दिल्यानंतर, ज्या व्यक्तीने शांत्यर्पण आणले आहे, तो व्यक्ती ते मांस याजक आणि इतर इस्राएली लोकांच्याबरोबर वाटत असे.
  • या अर्पनाबरोबर अन्न सुद्धा असायचे, ज्यामध्ये बेखमीर भाकरीचा समावेश होता.
  • ह्याला काहीवेळा "शांत्यर्पण" असे सुद्धा म्हंटले जाते.

(हे सुद्धा पहा: होमार्पण, परिपूर्ण, धान्यार्पण, दोषार्पण, शांत्यर्पण, याजक, बलिदान, बेखमीर भाकर, नवस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: