mr_tw/bible/other/dove.md

3.2 KiB

कबुतर, पारवा

व्याख्या:

कबुतर आणि पारवे हे दोन प्रकारचे लहान, राखाडी-तपकिरी पक्षी आहेत, जे एकसारखे दिसतात. एक कबुतर हे रंगामध्ये थोडे फिक्कट, जवळपास पांढरे असे असते.

  • काही भाषेमध्ये ह्यांच्यासाठी दोन वेगवेगळी नावे आहेत, तर उरलेल्या भाषेमध्ये दोन्हीसाठी एकाच नाव आहे.
  • कबुतर आणि पारवे ह्यांचा उपयोग देवाला बलिदान करण्यासाठी विशेषकरून अशा लोकांसाठी जे मोठा प्राणी विकत घेऊ शकता नव्हते, होत होता.
  • जेंव्हा पुराचे पाणी ओसरले, तेंव्हा कबुतराने जैतुनाच्या झाडाची एक काडी नोहाकडे आणली.
  • काहीवेळा कबुतर शुद्धता, निरपराधीपणा किंवा शांतीचे प्रतिक म्हणून चिन्हित केले जाते.
  • ज्या भाषेमध्ये भाषांतर करवयाचे आहे, त्या भाषेत कबुतर किंवा परवा माहित नसेल तर, त्या शब्दाचे भाषांतर "लहान राखाडी-तपकिरी रंगाचा पक्षी ज्याला कबुतर म्हणतात" किंवा "लहान राखाडी किंवा तपकिरी पक्षी जो अश्यासारखा दिसतो (स्थानिक पक्षाचे नाव लिहा)" असे केले जाऊ शकते.
  • जर दोन्ही कबुतर आणि परवा एकाच वाचनामध्ये संदर्भित केले असतील तर, शक्य असल्यास या पक्ष्यांसाठी दोन वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करा.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहाः जैतून, निरपराध, शुद्ध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: