mr_tw/bible/other/caughtup.md

2.5 KiB

नेण्यात आले (उचलण्यात आले), बरोबर येऊन चालू लागला (गाठले), गाठणे

व्याख्या:

"उचलण्यात आले" या शब्दाचा सहसा संदर्भ, देवाने एखाद्या मनुष्याला अद्भुतरीतीने अचानक स्वर्गापर्यंत नेण्याशी आहे.

  • "बरोबर चालू लागला" या वाक्यांशाचा संदर्भ एखाद्यापर्यंत पोहोचण्याची घाई केल्यानंतर त्याच्याजवळ पोहोचण्याशी येतो. "गाठणे" हा त्याच्या समान अर्थाचा दुसरा शब्द आहे.
  • प्रेषित पौल तिसऱ्या स्वर्गामध्ये "उचलले जाण्याच्या" संबंधात बोलतो. ह्याचे भाषांतर "वर घेतला जाणे" असे सुद्धा केले जाऊ शकते.
  • पौल म्हणतो, जेंव्हा ख्रिस्त परत येईल, तेंव्हा सर्व ख्रिस्ती लोक त्याला भेटण्यासाठी आकाशामध्ये "उचलले जातील."
  • "माझ्या पापांनी मला गाठले" या लाक्षणिक अभिव्यक्तीचे भाषांतर, "मी माझ्या पापाचे परिणाम भोगत आहे" किंवा "माझ्या पापामुळे मी सहन करत आहे" किंवा "माझे पाप माझ्या त्रासास कारणीभूत ठरत आहेत" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: चमत्कार, गाठणे, सहन करणे, त्रास)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: