mr_tw/bible/other/amazed.md

3.4 KiB

थक्क, आश्चर्यचकित, चकित, आश्चर्यकारक, चमत्कार, अद्भुते

व्याख्या:

असामान्य घडलेल्या काही गोष्टींमुळे आश्चर्यचकित झालेले दर्शवण्यासाठी या शब्दांचा संदर्भ दिला जातो.

  • यांपैकी काही शब्द ग्रीक भाषेतील शब्दप्रयोगाचे भाषांतर आहेत ज्यांचा अर्थ "आश्चर्यचकित होऊन थांबणे" किंवा "(स्वतःहून) बाहेर उभे राहणे" होतो. या अभिव्यक्तीतून हे दिसून येत की त्या व्यक्तीची भावना किती धक्कादायक आहे. इतर भाषांमध्ये सुद्धा कदाचित हे व्यक्त करण्याचे मार्ग असू शकतात.
  • सहसा अशी घटना जी चमत्कारिक आणि आश्चर्यकारक होती तो चमत्कार होता, आणि फक्त परमेश्वरच असे काही करू शकतो.
  • या शब्दांचा अर्थामध्ये गोंधळाच्या भावनांचा समावेश असू शकतो कारण जे घडले ते पूर्णपणे अनपेक्षित होते.
  • "अत्यंत आश्चर्यचकित" किंवा "खूप धक्कादायक" असेही या शब्दांचे भाषांतर करण्याचे मार्ग असू शकतात.
  • संबंधित शब्दांमध्ये "अद्भुत" (आश्चर्यकारक, विस्मयकारक), "आश्चर्य," आणि "विस्मय" यांचा सुद्धा समावेश होतो.
  • सर्वसाधारणपणे, हे शब्द सकारात्मक आहेत आणि व्यक्त करतात कि जे घडले त्याबद्दल ते लोक आनंदी होते.

(हे सुद्धा पहा चमत्कार, चिन्ह)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: