mr_tw/bible/kt/sign.md

5.0 KiB

चिन्ह, चिन्हे, साक्ष, स्मारक चिन्ह

व्याख्या:

चिन्ह म्हणजे एखादी वस्तू, घटना किंवा कृती आहे, जी विशेष अर्थाशी संवाद साधते.

  • "स्मारक चिन्हे" हे अशी चिन्हे आहेत, जी लोकांना काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी "आठवण" करून देण्यात मदत करतात, बऱ्याचदा असे काही ज्याचे वचन दिले गेले आहे:

    • आकाशात निर्माण होणारे मेघधनुष्य हे लोकांना आठवण करून देणारे एक चिन्ह आहे, ज्याचे त्याने आश्वासन दिले आहे की, तो पुन्हा जगभर पूर आणून पुराच्या पाण्याने सर्व जीवन नष्ट करणार नाही.
    • देवाने त्यांच्याशी केलेल्या कराराच्या चिन्हादाखल, देवाने इस्राएल लोकांना त्याच्या मुलांची सुंता करण्यास सांगितले.
  • चिन्हे काहीतरी प्रकट किंवा काश्याकडे तरी निर्देश करू शकतात:

    • देवदूताने मेंढपाळांना एक चिन्ह दिले, जेणेकरून त्यांना हे समजण्यास मदत होईल की बेथलहेममध्ये जन्मलेल्यांपैकी कोणता नवजात मसिहा आहे.
    • यहुदाने धार्मिक पुढाऱ्यांसाठी चिन्ह म्हणून येशूचे चुंबन घेतले, जेणेकरून त्यांना कळेल की येशू हाच आहे ज्याला त्यांना पकडायचे होते.
  • चिन्हे काहीतरी सत्य असल्याचे सिद्ध करू शकतात:

    • संदेष्टे आणि प्रेषितांनी जे चमत्कार केले, ते चिन्ह होते, ज्यांनी हे सिद्ध झाले की ते देवाचा संदेश सांगत होते.
    • येशूने केलेले चमत्कार हे चिन्ह होते,जे सिद्ध करत होते की, तो खरोखरच मसिहा आहे.

भाषांतर सूचना

  • त्याच्या संदर्भाच्या आधारावर, "चिन्ह" देखील "सांकेतिक खून" किंवा "प्रतिक" किंवा "खून" किंवा "पुरावा" किंवा "सबूत" किंवा "संकेत" म्हणून भाषांतरीत केले जाऊ शकते.
  • "हाताने चिन्हे करणे" ह्याचे भाषांतर "हाताने हालचाल करणे" किंवा "हाताने संकेत करणे" किंवा "खुनवणे" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषेमध्ये, "चिन्ह" जे काहीतरी सिद्ध करते ह्यासाठी एक शब्द असू शकतो, आणि "चिन्ह" जे चमत्कार आहे त्यासाठी दुसरा शब्द असू शकतो.

(हे सुद्धा पहा: चमत्कार, प्रेषित, ख्रिस्त, करार, सुंता)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: