mr_tw/bible/names/tyre.md

3.0 KiB

सोर, सोरी

तथ्य:

सोर हे एक प्राचीन कनानी शहर होते, जे आताच्या भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला होते, जे सध्याच्या लबानोनमधील आधुनिक देशांचा भाग आहे. त्याच्या लोकांना "सोरी" असे म्हंटले जाते.

  • या शहराचा काही भाग समुद्रात बेटावर स्थित होता, तो मुख्य भूभागापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर होता.
  • त्याचे स्थान आणि देवदार वृक्ष यासारख्या मौल्यवान नैसर्गिक संसाधानामुळे, सोर हे एक समृद्ध व्यापार उद्योग होता आणि ते खूप समृद्ध होते.
  • दावीद राजाला राजमहाल बांधताना मदतीसाठी सोरच्या हराम राजाने देवदार वृक्ष आणि कुशल कामगार पाठवले.
  • अनेक वर्षानंतर, शलमोन राजालासुद्धा मंदिर बांधताना मदतीसाठी, हराम राजाने लाकूड आणि कुशल कामगार पाठवले. शामोन राजाने त्याची भरपाई मोठ्या प्रमाणात गहू आणि जैतून तेल देऊन केली.
  • सोर हे नेहमी त्याच्या जवळचे प्राचीन शहर सिदोन ह्याच्याशी संबंधित होते. ही कनान देशातील फेनिके प्रांतातील सर्वात महत्वाची शहरे होती.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, देवदार, इस्राएल, समुद्र, फेनिके, सिदोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: