2.7 KiB
2.7 KiB
कादेश, कादेश-बर्णा, मरीबोथ कादेश
तथ्य:
कादेश, कादेश-बर्णा, आणि मरीबोथ कादेश या सर्व नावांचा संदर्भ इस्राएलाच्या महत्वाच्या शहराशी येतो, जे इस्राएलाच्या दक्षिणी भागात, एदोमाच्या प्रांताजवळ स्थित होते.
- कादेश शहर हे मरुहीरवळीचे ठिकाण होते, असे ठिकाण जिथे सीन वाळवंटाच्या मध्येच पाणी आणि सुपीक जमीन होती.
- मोशेने कादेश-बर्णा येथून कनानच्या भूमीत बारा हेर पाठवले.
- वाळवंटात भटकत असताना इस्राएली लोकांनीसुद्धा कादेश येथे तंबू लावला होता.
- कादेश-बर्णा या ठिकाणी मिर्याम मेली होती.
- मरीबोथ कादेश हे ठिकाण होते, जेथे मोशेने देवाची आज्ञा मोडली, आणि इस्राएली लोकांच्यासाठी पाणी मिळवताना, देवाने सांगितल्याप्रमाणे खडकाला बोलण्याच्या ऐवजी त्याने खडकावर काठी आपटली.
- "कादेश" हे नाव इब्री शब्दापासून येते, आणि त्याचा अर्थ "पवित्र" किंवा "वेगळा केलेला' असा होतो.
(भाषांतर सूचना: अनोळखी नावांचे भाषांतर कसे करावे
(हे सुद्धा पहा: वाळवंट, एदोम, पवित्र)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H4809, H6946, H6947