mr_tw/bible/names/jehoiakim.md

2.3 KiB

यहोयाकीम

तथ्य:

यहोयाकीम यहूदा राज्यावर राज्य करणारा एक दुष्ट राजा होता. त्याची सुरवात इ. स. पूर्व. 608 ला झाली. तो योशिया राजाचा मुलगा होता. त्याचे नाव मूलतः एल्याकीम होते.

  • मिसरचा राजा नखो याने एल्याकीम याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले आणि त्याला यहुदाचा राजा केला.
  • नखोने यहोयाकीमला मिसराला उच्च कर भरण्यासाठी भाग पाडले.
  • नंतर नबुखद्नेस्सर राजाने जेंव्हा यहुदावर आक्रमण केले, यहोयाकिम हा त्यातला एक होता, ज्यांना त्याने बाबेलाला बंदी म्हणून नेले.
  • यहोयाकिम हा दुष्ट राजा होता, ज्याने यहूदाला याहोवापासून दूर नेले. यिर्मिया संदेष्ट्याने त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: बाबेल, एल्याकीम, यिर्मिया, यहूदा, नबुखद्नेस्सर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: