mr_tw/bible/names/gaza.md

2.8 KiB

गज्जा

तथ्य:

पवित्र शास्त्राच्या काळात, गज्जा हे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या एक समृद्ध पलिष्टी शहर होते, जे अश्दोदपासून 38 किलोमीटर अंतरावर होते. हे पलीष्ट्यांच्या पाच मोठ्या शहरांपैकी एक होते.

  • त्याच्या स्थानामुळे, गज्जा हे महत्वाचे समुद्रातील बंदर होते, जिथे अनेक वेगवेगळ्या लोकसमूहांच्यामध्ये आणि राष्ट्रांमध्ये व्यवसायिक देवाणघेवाणीचे कार्यक्रम चालत असत.
  • गज्जाच्या पट्ट्यामध्ये आजही गज्जा हे एक मुख्य शहर आहे, जो एक जमिनीचा प्रांत आहे जो भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला लागून आहे, त्याच्या उत्तर आणि पूर्व सीमेला इस्राएल तर दक्षिण सीमेला मिसर आहे.
  • गज्जा हे शहर होते, जिथे पलीष्ट्यांनी शमसोनाला पकडल्यानंतर घेऊन गेले.
  • फिलिप्प सुवर्तीक हा गज्जाकडे जाणाऱ्या वाळवंटाच्या रस्त्यावरून जात होता, जेंव्हा तो इथिओपियाच्या षंढाला भेटला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अश्दोद, फिलिप्प, पलीष्टी, इथिओपिया, गथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: