mr_tw/bible/names/ethiopia.md

3.3 KiB

इथिओपिया, इथिओपियाच्या

तथ्य:

इथिओपिया हा आफ्रिकेमध्ये मिसरच्या दक्षिणेस वसलेला, आणि त्याच्या पश्चिमी सीमेला नाईल नदी आणि पूर्वेला तांबड्या समुद्राने त्याची सीमा तयार केलेला असा देश आहे. इथिओपियामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला "इथिओपियाचा" असे म्हंटले जाते.

  • प्राचीन इथिओपिया हे मिसरच्या दक्षिणेस स्थित होते आणि त्याच्यामध्ये जी जमीन होती त्यामध्ये, आताच्या आफ्रिकी देशाचा भाग असलेल्या अनेक देशांचा समावेश होता, जसे की, सुदान, आधुनिक इथिओपिया, सोमालिया, केनिया, युगांडा, मध्य आफ्रिकन रिपब्लिक, आणि चाड.
  • पवित्र शास्त्रामध्ये, इथिओपियाला काहीवेळा "कुश" किंवा "नुबिया" असे म्हंटले आहे.
  • पवित्र शास्त्रामध्ये, इथिओपिया ("कुश") आणि मिसर ह्यांच्या देशांचा बऱ्याचदा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे, कारण कदाचित ते एकमेकांच्या समोर स्थित होते, आणि कदाचित त्यांच्या लोकांतील काहींचे पूर्वज एकच असावेत.
  • देवाने फिलिप्प सुवर्तीकाला वाळवंटात पाठवले, जिथे त्याने इथिओपियाच्या षंढाला येशूची सुवार्ता सांगितली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कुश, मिसर, षंढ, फिलिप्प)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: