mr_tw/bible/kt/nazirite.md

3.6 KiB

नाजीर, नाजीराचा नवस

तथ्य:

"नाजीर" या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी आहे ज्याने "नाजीराचा नवस" केला आहे. बऱ्याचदा हा नवस पुरुषांनी केला, पण स्त्रिया सुद्धा हा नवस करू शकतात.

  • ज्या व्यक्तीने नाजीराचा नवस केला होता, तो व्यक्ती नवस केलेल्या कालावधीपर्यंत तो नवस पूर्ण करण्यासाठी, द्राक्ष्यापासून बनवलेले अन्न किंवा पेय न खाण्याबद्दल मान्य करतो. या काळात, त्या व्यक्तीने त्याचे केस कापायचे नसते, आणि कोणत्याही मृत शरीराच्या जवळ जायचे नसते.
  • जेंव्हा ठरलेली वेळ संपते, आणि नवस पूर्ण होतो, तेंव्हा नाजीराने याजकाकडे जाऊन अर्पण प्रदान करायचे असते. ह्याच्यामध्ये त्याचे कापणे आणि ते जाळण्याचाही समावेश होतो. अन्य सर्व निर्बंधसुद्धा काढून टाकले जातात.
  • शिमसोन हा जुन्या करारातील प्रसिद्ध मनुष्य आहे, जो नजीराच्या नवसामध्ये होता.
  • बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माबद्दल घोषणा करणाऱ्या देवदुताने जखऱ्याला सांगितले की, त्याच्या पुत्राने कोणतेही मादक पेय पिऊ नये, ज्याने हे सूचित होते की, योहान हा नाजीराच्या नवसामध्ये होता.
  • प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील परिच्छेदाप्रमाणे, प्रेषित पौलाने देखील एकेकाळी हा नवस बोलला होता, हे प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील एका परिच्छेदाप्रमाणे आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: (बाप्तिस्मा करणारा) योहान, बलिदान, शिमसोन, नवस, जखऱ्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: