mr_tw/bible/kt/kingofthejews.md

4.4 KiB
Raw Permalink Blame History

यहुद्यांचा राजा

व्याख्या:

"यहुद्यांचा राजा" हा शब्द, एक शिर्षक आहे ते, येशू, मासिहाला संदर्भित करण्यासाठी वापरले जाते.

  • जेंव्हा ज्ञानी लोक बेथेलेहेमास बाळाला भेटण्यासाठी, जो "यहुद्यांचा राजा" होता, गेले तेंव्हा, हे शीर्षक पहिल्यांदा पवित्र शास्त्रात त्यांच्याकडून वापरले गेले.
  • देवदुताने मरीयेला प्रकट केले की. तिचा मुलगा, दावीद राजाचा वंशज, एक राजा असेल आणि त्याचे राज्य सर्वकाळ टिकेल.
  • येशूला वधस्तंभावर खिळवण्यापुर्वी, रोमी सैन्यांनी थट्टेने येशूला "यहुद्यांचा राजा" असे संबोधले. हे शीर्षक एका लाकडाच्या तुकड्यावर लिहिले आणि येशूच्या वधस्तंभाच्या टोकाला खिळले.
  • येशू खरोखर यहुद्यांचा राजा आणि सर्व सृष्टीवर राजा आहे,

भाषांतर सूचना

  • "यहुद्यांचा राजा" या शब्दाचे भाषांतर "यहुद्यांवरील राजा" किंवा "यहुदावर राज्य करणारा राजा" किंवा "यहुद्यांचा सर्वोच्च शाषक" असे केले जाऊ शकते.
  • "चा राजा" हा वाक्यांश भाषांतराच्या इतर ठिकाणी कसा भाषांतरित केला आहे, हे तपासून पहा.

(हे सुद्धा पहा: वंशज, यहुदी, येशू, राजा, राज्य, देवाचे राज्य, ज्ञानी लोक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 23:09 थोडया दिवसांनंतर, पूर्व दिशेला एक विशेष तारा ज्ञानी लोकांनी पाहिला. त्यांना समजले की, हा यहूद्यांचा एक नवा राजा जन्मास आला आहे.

  • 39:09 पिलाताने येशूला विचारले, ‘‘तू यहू़द्यांचा राजा आहेस काय?

  • 39:12 रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!

  • 40:02 पिलाताने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी यहूद्यांचा राजा अशी लिहिलेली पाटी वधस्तंभाच्या वर येशूच्या डोक्यावर लावावी.

  • Strong's: G935, G2453