mr_tw/bible/kt/faithful.md

63 lines
8.9 KiB
Markdown
Raw Normal View History

# विश्वासू, विश्वासूपणा, विश्वासघातकी, विश्वासघातकीपणा
## व्याख्या:
देवाशी “विश्वासू” राहण्याचा अर्थ सतत देवाच्या शिकवणुकीनुसार जगणे. म्हणजे त्याचे ऐकून त्याच्याशी एकनिष्ठ राहणे. विश्वासू राहण्याची अवस्था किंवा स्थिती म्हणजे “विश्वासुपणा”.
* विश्वासू व्यक्तीवर त्याने आपली अभिवचने नेहमी पाळतो आणि इतर लोकांवर त्याची नेहमी जबाबदारी पार पाडतो याद्वारे नेहमी विश्वास ठेवला जाऊ शकतो.
* एक विश्वासू माणूस एखादी गोष्ट लांब आणि कठीण असली तरीही एखादे कार्य करण्यास धडपडत असतो.
* देवाप्रती विश्वासू राहणे म्हणजे जे आपण करावे अशी देवाची इच्छा आहे ते सतत करत राहणे.
“अविश्वासू” या शब्दामध्ये अशा लोकांचे वर्णन केले आहे जे देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे करत नाहीत. विश्वासघातकी होण्याची स्थिती किंवा सराव म्हणजे “विश्वासघात”.
* जेव्हा इस्राएल लोकांनी मूर्तिपूजा करण्यास सुरवात केली आणि इतर मार्गांनी देवाची आज्ञा मोडली तेव्हा त्यांना “अविश्वासु” म्हटले गेले.
* विवाहात जो कोणी व्यभिचार करतो तो आपल्या जोडीदाराशी “अविश्वासु” असतो.
* देवाने इस्राएलच्या आज्ञा न मानणाऱ्या वर्तनाचे वर्णन करण्यासाठी “विश्वासघात” हा शब्द वापरला. ते देवाची आज्ञा पाळत नव्हते किंवा त्याचा आदर करीत नव्हते.
## भाषांतरातील सूचना:
* बर्‍याच संदर्भांमध्ये, “विश्वासू” या संज्ञेचे भाषांतर “निष्ठावंत” किंवा “समर्पित” किंवा “विश्वासार्ह” म्हणून केले जाऊ शकते.
* अन्य संदर्भांमध्ये, “विश्वासू” या संज्ञेचे भाषांतर एखाद्या शब्दाद्वारे किंवा वाक्यांशातून करता येते ज्याचा अर्थ “विश्वास ठेवणे” किंवा “चिकाटीने देवावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे” असे केले जावू शकते
* “विश्वासूपणा” भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये “चिकाटीने विश्वास ठेवणे” किंवा “निष्ठा” किंवा “विश्वासार्हता” किंवा “देवावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे” याचा समावेश असू शकतो.
* संदर्भानुसार, “विश्वासघातकी” असे भाषांतर “अविश्वासु” किंवा “विश्वासू नाही” किंवा “आज्ञाधारक नाही” किंवा “निष्ठावंत नाही” असे केले जाऊ शकते.
* “अविश्वासू” या वाक्यांशाचे भाषांतर “लोक विश्वासू (देवाशी) नाही” किंवा “अविश्वासु लोक” किंवा “देवाची आज्ञा मोडणारे लोक” किंवा “देवाविरुद्ध बंड करणारे लोक” असे केले जाऊ शकते.
* “विश्वासघात” या शब्दाचे भाषांतर “आज्ञा मोडणे” किंवा “बेईमानी” किंवा “विश्वास न ठेवणे किंवा आज्ञांचे पालन न करणे” असे केले जाऊ शकते.
* काही भाषांमध्ये “अविश्वासू” हा शब्द “अविश्वास” या शब्दाशी संबंधित आहे.
(हे देखील पाहा: [व्यभिचार], [विश्वास ठेवणे], [आज्ञा न पाळणे], [विश्वास], [विश्वास ठेवा])
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ती24:49]
* [लेविय 26:40]
* [गणना 12:07]
* [यहोशवा 02:14]
* [शास्ते02:16-17]
* [1 शमुवेल 02:9]
* [स्तोत्रसंहीता 012:1]
* [नीतिसुत्रे 11:12-13]
* [यशया 01:26]
* [यिर्मया 09:7-9]
* [होशेय 05:07]
* [लूक 12:46]
* [लूक 16:10]
* [कलसैकरांस पत्र01:07]
* [1 थेस्सलनीकरांस पत्र 05:24]
* [3 योहान 01:05]
## पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:
* __[08:05]__ तुरुंगातदेखील योसेफ देवाप्रती __विश्वासू __ राहिला आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला.
* __[14:12]__ तरीही, देव अब्राहाम, इसहाक आणि याकोबाला दिलेल्या अभिवचनांशी __विश्वासू__ होता.
* __[15:13]__ लोकांनी देवाशी __ विश्वासू__ राहण्याचे आणि त्याच्या नियमांचे पालन करण्याचे वचन दिले.
* __[17:09]__ दावीदाने बरेच वर्ष न्यायाने आणि __विश्वासुपणाने__ राज्य केले,आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला. परंतु, आपल्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरूद्ध भयंकर पाप केले.
* __[18:04]__ देव शलमोनावर क्रोधित झाला आणि शलमोनाच्या __अविश्वासूपणाची__ शिक्षा म्हणून, त्याने शलमोनाच्या मृत्युनंतर इस्राएल राष्ट्राला दोन भागात विभागण्याचे वचन दिले.
* __[35:12]__ "मोठा मुलगा वडिलांना म्हणाला, 'मी इतकी वर्षे तुमच्यासाठी __विश्वासुपणाने__ काम केले आहे.
* __[49:17]__ परंतु देव __ विश्वासू__ आहे आणि म्हणतो की आपण आपल्या पापांची कबुली दिली तर तो आपल्याला क्षमा करील.
* __[50:04]__ जर तू शेवटपर्यंत माझ्याशी __ विश्वासू__ राहिल्यास, तर देव तुला वाचवेल. "
## शब्द संख्या:
* स्ट्रॉन्गचे: एच529, एच530, एच539, एच540, एच571, एच898, एच2181, एच4603, एच4604, एच4820, जी569, जी571, जी4103