Door43-Catalog_mr_tn/1CO/07/05.md

2.5 KiB

एकमेकांबरोबर लैंगिक संबंधांत वंचना करू नका

AT: "तुमच्या जोडीदारास लैंगिक तृप्ती देण्यांस नकार देऊ नका"

प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून

प्रार्थनेत अधिक समय व्यतीत करण्यासाठी दोघांच्या संमतीने कांही दिवस संभोग न करण्याचा त्यांनी निर्णय घ्यावा; यहूदी धर्मामध्ये हा काळ जवळ जवळ १ ते २ आठवड्यांचा असतो.

स्वत:ला वाहून घ्या

"एकमेकांच्या स्वाधीन असा"

मग पुन्हा एकत्र व्हा

परत लैंगिक संबंध सरू करा.

तुमच्या असंयमामुळे

AT: "कारण कांही दिवसांनंतर तुमच्या लैंगिक इच्छेवर तुम्हांला नियंत्रण करणे कठीण जाईल."

तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो

पौल करिंथकरांना प्रार्थनेकरिता त्यांनी अल्पकाल लैंगिक संबंधापासून दूर राहावे, परंतु हे विशेष बाबीसाठी असून सततची आवश्यकता नाही.

मी जसा आहे

जसा पौल आहे तसा, अविवाहित (पूर्वी लग्न झालेला, किंवा कधीहि लग्न न झालेला),

तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे

AT: "देव एकाला एक क्षमता देतो आणि दुसऱ्याला दुसरी क्षमता देतो"