Door43-Catalog_mr_tn/1CO/03/18.md

1.5 KiB

कोणी स्वत:ला फसवून घेऊ नये

मी स्वत: या जगांत ज्ञानी आहे ह्या लबाडीवर कोणीहि विश्वास ठेवू नये.

या युगांत

"आता"

त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे

"देवाच्या खऱ्या ज्ञानास प्राप्त करण्यासाठी या जगाच्या मूर्खपणाबद्दलच्या कल्पनेस त्या व्यक्तीने स्वीकारले पाहिजे." (पाहा: उपरोधिक).

तो ज्ञान्यांस त्यांच्याच मूर्खपणांत धरतो

जे लोक स्वत:ला शहाणे समजतात देव त्यांना सांपळ्यांत पकडतो, आणि त्यांना पकडण्यासाठी त्यांच्याच डांवपेचांचा उपयोग करतो.

ज्ञान्यांचे विचार देव ओळखतो

AT: जे लोक स्वत:ला शहाणे समजतात त्यांच्या योजनांना देव ओळखतो" किंवा "ज्ञान्यांच्या सर्व योजनांना तो ऐकतो" (UDB).