Door43-Catalog_mr_tn/MAT/11/25.md

6.6 KiB

येशू अजूनहि लोक समुदायासमोर उपस्थित असतांना तो त्याच्या स्वर्गीय पित्याची प्रार्थना करीत आहे.

येशूने उत्तर देत म्हटले

ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) १२:१ मध्ये येशूने शिष्यांना पाठविले होते आणि तो कोणीतरी त्याला विचारलेल्या कांही गोष्टीबद्दल प्रतिसाद देत होता, किंवा २) पश्चात्ताप न केलेल्या नगरांविषयी येशू त्यांना दोष देण्याचे संपत करीत होता: "आणखी, येशूने म्हटले."

हे पित्या

हे कोणा जगिक पित्याचा उल्लेख करीत नसून देव पित्याचा उल्लेख करीत आहे.

स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो

ह्याचे सामीप्य मुलक म्हणून भाषांतर केले जाऊ शकते, "पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सर्वलोक आणि सर्व गोष्टींवरचा मालक, " किवा उपलक्षण म्हणून भाषांतर केले जाऊ शकते "अवघ्या सृष्टीचा मालक" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा आणि उपलक्षण)

ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टीं गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या

"ह्या गोष्टीं" कोणत्या हे स्पष्ट झाले नाही." जर तुमच्या भाषेत ह्याचे स्पष्टीकरण करण्याची गरज असली तर पर्यायी भाषांतर चांगले ठरू शकेल: "तू ज्ञानी आणि शिक्षित लोकांना सत्यें शिकू दिली नाहीस परंतु ती सत्यें तू अशिक्षित लोकांना प्रगट केलीस."

गुप्त ठेवली

"लपून ठेवली" हे क्रियापद "प्रगट केले" ह्याच्या विरुद्ध आहे.

ज्ञानी आणि विचारवंत

"ज्ञानी आणि विचारवंत लोक" पर्यायी भाषांतर: "ते लोक जे स्वत:ला स्न्यांनी आणि विचारवंत समजतात." (पाहा यु डी बी , उपरोध)

त्यांना प्रगट केल्या

"त्यांना" हे सर्वनाम ह्या वचनांत अगोदर आलेल्या "ह्या गोष्टी" ह्यांचा उल्लेख करतो .

न शिकवलेल्या अशा बाळकांसारख्या

एक शब्द ज्याचे दोन अर्थ होतात "बाळकें" आणि "न शिकवलेले" किंवा "अज्ञानी" पर्यायी भाषांतर: "अज्ञानी लहान बाळकें"

बाळकांसारखे

लोक जे ज्ञानी किंवा सुशिक्षित नाहीत, किंवा ते लोक ज्यांना हे माहती आहे की ते ज्ञानी किंवा सुशिक्षित नाहीत त्यांच्यासाठी ही उपमा आहे. (पाहा: उपमा)

कारण हेच तुला योग्य दिसले

"कारण हे करणे तुला चांगले वाटले"

माझ्या पित्याद्वारे माझ्या हाती सर्व कांही दिले गेले आहे

ह्याचे कर्तरी क्रियापदांत भाषांतर केले जाऊ शकते: "माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व कांही दिले आहे" किंवा "माझ्या पित्याने माझ्या हातात सर्व कांही सोपविले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

पित्यावांचून पुत्राला कोणी ओळखीत नाही

"केवळ पिताच पुत्राला ओळखतो"

पुत्राला ओळखतो

"वैयक्तिक अनुभवावरून ओळखतो"

पुत्र

येशू स्वत:चा उल्लेख त्रैकत्वामधील तिसरी व्यक्ती म्हणून करीत आहे. (पाहा: प्रथम, दुसरा, किंवा तिसरा व्यक्ती)

पुत्रावांचून पित्याला कोणी ओळखीत नाही

"केवळ पुत्रच पित्याला ओळखतो"

पित्याला ओळखतो

"वैयक्तिक अनुभवावरून ओळखतो"

आणि त्याला ज्या कोणास प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल तर

"पित्याला प्रगट करावयाची जर पुत्राची इच्छा असेल तर लोकांना माहित होईल की पिता कोण आहे."

त्याला ज्या कोणास प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल तर

"त्याला" हे सर्वनाम देव पित्याचा उल्लेख करते.