Door43-Catalog_mr_tn/EPH/02/08.md

2.0 KiB
Raw Permalink Blame History

कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे

देवाची आपल्याप्रती दया हेच कारण आहे की त्याने आपला बचाव न्यायापासून केला जर केवळ आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर.

हे तुमच्या हातून झाले नाही

‘’हे’’ ह्याचा संदर्भ तुमचे कृपेने झालेल्या तारणाशी आहे.

आपल्याकडून आले

‘’आपल्याकडून’’ ह्या सर्वनामाचा संदर्भ पौल आणि इफिस येथील सर्व विश्वासणाऱ्याशी आहे. (पहा: निवडक)

कर्मे केल्याने हे झाले नाही

‘‘हे तारण आपल्या कर्मांनी मिळाले नाही’’

आपण ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण झालेले, त्याची हस्तकृती आहोत

‘’ख्रिस्त येशूला जोडले गेलेले नवीन लोक म्हणून देवाने आपल्याला निर्माण केले आहे’’ आपण देवाच्या निर्मितीचा परिणाम आहोत. ‘’आपण’’ ह्या सर्वनामाचा संदर्भ पौल आणि इफिस येथील विश्वासणाऱ्याशी आहे. (पहा: समाविष्ट)

चालवावा

‘’चालले’’ किंवा ‘’अनुसरण करणे’’