Door43-Catalog_mr_tn/3JN/01/09.md

2.7 KiB

मंडळी

गायस आणि विश्वासणाऱ्यांचा जमाव देवाची आराधना करण्यासाठी एकत्र जमतात त्यांच्या संदर्भात आहे.

दियत्रफेस

तो मंडळीचा सभासद होता.(पहा:भाषांतरीत नाव)

त्याला त्यांच्यात श्रेष्ठ होण्याची आवड आहे

“त्याला त्यांचा नेता बनण्याची आवड आहे”

आमचा स्वीकार करत नाही

“आमचा”हा शब्द योहान आणि जे त्याच्याबरोबर आहेत त्यांच्या संदर्भात आहे.गायसचा त्यांच्यात समावेश नाही.(पहा:अनन्य)

तो आम्हाविरुध्द वाईट गोष्टी बोलून वटवट करतो.

“आणि तो कसा वाईट गोष्टी बोलतो ज्या नक्कीच सत्य नाहीत.”

तो स्वत:

“स्वत: "हा शब्द दियत्रफेस याच्या संदर्भात जो वाईट गोष्टी करतो त्यावर जोर देण्यासाठी आहे. (पहा:कर्ताच क्रियेचे कर्म असे सर्वनाम)

बंधुचा स्वीकार करत नाही

“सहकारी बंधूच स्वागत करत नाही.”

आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छीतात त्यांना मना करतात

ह्या वाक्यात काही शब्द गाळले आहेत,परंतु ते समजतात.पर्यायी भाषांतर: “आणि जे विश्वासणाऱ्यांच स्वागत करू इच्छीतात त्यांना तो थांबवतो.”(पहा:वाक्यरचनेला आवश्यक शब्द)

आणि त्यांना घालवून टाकतो

“आणि तो त्यांना सक्तीने घालवतो” “त्यांना” हा शब्द ज्यांना सहकारी विश्वासणाऱ्यांच स्वागत करायच आहे त्यांच्या संदर्भात आहे.