mr_tn/1pe/01/intro.md

3.2 KiB

1 पेत्र 01 सामान्य माहिती

स्वरूप आणि संरचना

पेत्र 1-2 वचनात औपचारिकरीत्या या पत्राची ओळख करून देतो. प्राचीनकाळी पूर्वेकडील लेखक पत्राची सुरवात बऱ्याचदा अशा प्रकारे करत होते.

काही भाषांतरे पद्याची प्रत्येक ओळ ही वाचण्यासाठी सुलभ व्हावी म्हणून इतर मजकुरांपेक्षा अधिक उजवीकडे ठेवत. युएलटी ने हे 1:24-25 मध्ये जुन्या करारातील उधृत केलेल्या पद्यासह केले आहे.

या अधिकारातील विशेष संकल्पना

देवाने काय प्रकट केले

जेंव्हा येशू पुन्हा परत येईल, तेंव्हा येशूवर विश्वास असलेले देवाचे लोक किती चांगले होते हे प्रत्येकजण पहिल. नंतर देवाचे लोक पाहतील की देव त्यांच्याबरोबर किती दयाळू होता, आणि सर्व लोक देव आणि त्याचे लोक दोहोंची स्तुती करतील.

पवित्रता

देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी पवित्र असावे कारण देव पवित्र आहे. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/holy)

अनंतकाळ

पेत्र ख्रिस्ती लोकांना अशा गोष्टींसाठी जगायला सांगतो ज्या सार्वकालिक असतील ना की या जगातील अशा गोष्टी ज्यांना अंत आहे. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/eternity)

या अधिकारातील भाषांतराच्या इतर शक्य अडचणी

विरोधाभास

एक विरोधाभास हे सत्य विधान आहे जे काहीतरी अशक्य याचे वर्णन करण्यासाठी प्रकट होते. पेत्र लिहितो की त्याचे वाचक एकाच वेळी आनंदी आणि दुःखी आहेत (1 पेत्र 1:6). तो असे म्हणू शकतो कारण त्यांचा छळ होत आहे म्हणून ते दुःखी आहेत, परंतु ते आनंदी आहेत कारण त्यांना माहित आहे की “योग्य वेळी” देव त्यांना सोडवेल (1 पेत्र 1:5)