3.2 KiB
स्वर्गाच्या राज्याच्या दाखल्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी येशू त्याच्या शिष्यांबरोबर एका घरांत जातो व ते तो पुढे चालू ठेवतो. ह्या दोन दाखल्यांमध्ये, येशू त्याच्या शिष्यांना स्वर्गाचे राज्य हे कशासारखे आहे हे शिकविण्यासाठी दोन उपमांचा उपयोग करतो (पाहा: उपमा)
स्वर्गाचे राज्य च्या सारखे आहे
तुम्ही उपमेमध्ये ह्याचे कसे भाषांतर केले ते पाहा)
शेतात लपविलेली ठेव
ठेव ही फार मौल्यवान बहुमोल वस्तू आहे किंवा गोष्टींचा संग्रह आहे. ह्याचे कर्तरी क्रियापदा सोबत भाषांतर केले जाऊ शकते: "कोणीतरी शेतामध्ये लपविलेली ठेव" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
तिला लपविले
"तिला झांकले"
आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो
माहिती अशी आहे की, तो व्यक्ती त्या शेतात्तील ठेविला प्राप्त करण्यासाठी ते शेत विकत घेतो. (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)
व्यापारी
व्यापारी हा व्यवसायी किंवा घाऊक विक्रेता असतो, जो नेहमी विक्रीचा माल विविध जागेतून प्राप्त करतो.
मोलावान मोत्याचा शोध करणे
निहीत माहिती अशी आहे की तो मनुष्य मोलवान मोत्याचा शोध ह्यासाठी करीत होता की त्याला तो विकत घेऊ शकेल. (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)
मोलावान मोती
ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "उत्तम मोती" किंवा "सुंदर मोत्ती" "मोती" हा समुद्रातील शिंपल्या मध्ये तयार झालेला गुळगुळीत, कठीण, चमकदार, सफेद किंवा रंगीत मणी आहे जो रत्नासारखा खूप मौल्यवान असतो आणि त्याचे बहुमोल दागिने सुद्धा केले जातात.