mr_tn/MAT/13/40.md

2.5 KiB

स्वर्गाच्या राज्याच्या दाखल्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी येशू त्याच्या शिष्यांबरोबर एका घरांत जातो व ते तो पुढे चालू ठेवतो.

म्हणून, जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात

ह्याचे कर्तरी क्रियापदामध्ये भाषांतर केले जाऊ शकत: "म्हणून, जसे लोक निदण गोळा करून त्यांना अग्नीत जाळतात." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

जगाचा अंत

"युगाची समाप्ती"

मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील

येशू येथे स्वत:बद्दल बोलत आहे. ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "मी, मनुष्याचा पुत्र, मी माझ्या दूतांना पाठविन."

ते जे सर्व अनाचार करणारे

"ते जे सारे नियमशास्त्र भंग करणारे" किंवा "दुष्ट लोक"

अग्नीची भट्टी

ह्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते, "धगधगणारी भट्टी." जर "भट्टी" ही अपरिचित असेल तर "एक प्रकारची मोठी चूल" तिचा उपयोग केला जाऊ शकतो.

सूर्यासारखे प्रकाशतील

"सूर्याला जसे बघतो तसे बघण्यांस सोपे" (पाहा: उपमा)

ज्याला कान आहेत तो ऐको

कांही भाषांमध्ये द्वितीय पुरुषाचा उपयोग केल्यास अधिक स्वाभाविक वाटेल: "तुम्ही जे तुम्हांला कान आहेत ते ऐका" किंवा "तुम्हांला कान आहेत तर तुम्ही ऐका" (पाहा: प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरुष)