mr_tn/MAT/11/09.md

2.7 KiB

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल येशू लोकसमुदायास सांगणे पुढे चालू ठेवतो.

परंतु तूम्ही बाहेर काय बघण्यासाठी गेला होता

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल अलंकारयुक्त प्रश्नांची मालिका पुढे चालू राहाते. (पाहा; अलंकारयुक्त प्रश्न)

परंतु तुम्ही बाहेर काय बघण्यासाठी गेला होता~एका संदेष्ट्याला? मी तुम्हांला सांगतो होय,

बहुवचन सर्वनाम "तुम्ही" हे दोन्ही उदाहरणांत लोकसमुदायाचा उल्लेख करते.

संदेष्ट्याहूनहि जो श्रेष्ठ त्याला

"एका मामुली संदेष्ट्यांस नव्हे" किंवा "सामान्य संदेष्ट्याहून अधिक श्रेष्ठ"

तो हाच आहे

"हा" हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उल्लेख करते.

ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे

सर्वनाम "तो" हे पुढील वाक्यांशामध्ये येणाऱ्या "माझा दूत" ह्याचा उल्लेख करतो.

पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवितो, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील

येशू येथे संदेष्टा मलाखीच्या पुस्तकातील अवतरणाचा उल्लेख देत मलाखी ३:१ मध्ये ज्या दूताबद्दल सांगितले आहे तो योहानाच आहे असे म्हणत आहे.

मी माझ्या दूताला पाठवितो

सर्वनाम "मी" आणि "माझ्या" हे देवाचा उल्लेख करतात. जुन्या कराराच्या भविष्यवाणीचा लेखक हा देवाने जे सांगितले त्याचा उल्लेख करीत आहे.