mr_tn/MAT/11/01.md

3.1 KiB

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांना येशूने कसा प्रतिसाद दिला ह्या कथेच्या विभागाची येथे सुरूवात होते.

मग असे झाले की

ह्या अहवालाची येथे सुरुवात होते हे दाखविण्यासाठी ह्या वाक्यांशाचा उपयोग केला गेला आहे. जर तुमच्या भाषेत अहवालाच्या सुरुवातीला दाखविण्यासाठी मार्ग असेल तर त्याच येथे उपयोग करा. त्याचे असे भाषांतर होऊ शकते: "नंतर" किंवा "त्यानंतर"

सूचना देणे

ह्या शब्दाचे असे भाषांतर केले जाऊ शकते: "शिकवणे" किंवा "आदेश देणे"

त्याचे बारा शिष्य

हे येशूच्या बारा निवडलेल्या प्रेषितांचा उल्लेख करतो.

आता

"त्या वेळेस" ह्याला वगळले सुद्धा जाऊ शकते (पाहा यु डी बी )

च्या विषयी योहानाने बंदिशाळेत ऐकले तेव्हा

पर्यायी भाषांतर: "जेव्हा योहान बंदिशाळेत होता, तेव्हा त्याने च्या विषयी ऐकले" किंवा "बंदिशाळेत असणाऱ्या योहानाला जेव्हा च्या विषयी कोणीतरी सांगितले"

त्याने शिष्यांच्या हाती संदेश पाठविला

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने स्वत:च्या शिष्यांच्या हाती येशूला संदेश पाठविला.

आणि त्याला म्हटले

सर्वनाम "त्याला" हे येशूचा उल्लेख करते.

जे येणार ते आपणच का

जरी ह्याचे भाषांतर "येणारे तेच" किंवा "जे येणारे त्याची आम्ही अपेक्षा करतो ते," हे मशीहा साठी शिष्टोक्ति आहे. ("ख्रिस्त," यु डी बी )

आम्ही वाट बघावी

"आम्ही अपेक्षा करावी" "आम्ही" हे सर्वनाम केवळ योहानाच्या शिष्यांचाच नव्हे तर सर यहूदी लोकांचा उल्लेख करतो.