mr_tn/MAT/02/04.md

1.7 KiB

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.

यहूदीयातील बेथलेहेमात

पर्यायी भाषांतर: "यहूदीयातील बेथलेहेम शहरांत."

असे संदेष्ट्याच्या द्वारे लिहिले आहे

हे कर्तरी प्रयोगामध्ये लिहिले जाऊ शकते "हे असे संदेष्ट्याने लिहिले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

संदेष्ट्याच्या द्वारे लिहिले आहे

पर्यायी भाषांतर: "मीखा संदेष्ट्याने लिहिले आहे."

हे बेथलेहेमा तू....यहूद्यांच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही

"तुम्ही जे बेथलेहेमामध्ये राहाता, तुमचे शहर हे निश्चितच महत्वाचे आहे" (यु डी बी ) किंवा "तू बेथलेहेमा...सर्व शहरांमध्ये तू फार महत्वाचा आहेस." (पाहा: परोक्ष संबोधन) (पाहा:पर्यायोक्ती)