mr_tn/LUK/19/43.md

3.5 KiB
Raw Blame History

(येशू त्या यरुशलेम शहराच्या बाहेर बोलत राहतो)

कारण

जे उरते ते येशूच्या दुःखाचे कारण आहे.

ते दिवस तुमच्यावर येतील

हे दर्शवते की त्यांना कठीण समयांचा अनुभव येईलच. काही भाषा येणाऱ्या समयाच्या बद्दल बोलत नाही. म्हणूनच ह्याचे भाषांतर ‘’भविष्यात ह्या गोष्टी तुमच्यावर येतीलच’’ किंवा ‘’लवकरच तुम्ही कठीण समयांना सामोरे जाल.

तू

‘’तू हा शब्द एकवचनी आहे कारण येशू शहराशी बोलत होता. पण जर तुमच्या भाषेत हे स्वाभाविक नसेल तर, शहरातील लोकांना संदर्भ देण्यासाठी तुम्ही ‘’तू’ चे अनेकवचनी स्वरूप वापरू शकतात. (पहा: तू चे स्वरूप)

प्रतिबंधाची भिंत (मेढकोट)

शहराच्या बाहेर लोकांनी जाऊ नये म्हणून त्यांना थांबवण्यासाठी ही एक भिंत होती.

ते तुला जमिनीवर पाडतील

येशू त्या शहराशी बोलत होता म्हणून, ह्याचा संदर्भ शहरतील भिंती आणि इमारतींशी आहे. ह्याचे भाषांतर देखील ‘’ते तुमच्या भिंतींचा नाश करतील’’ किंवा ‘’ते तुमच्या शहराचा नाश करतील.

आणि तुमच्यातील लहान मूले

ह्याचा संदर्भ शहरातील राहिलेल्या लोकांशी आहे. ह्या शास्त्रभागात तुम्ही तू चे अनेकवचनी स्वरूप वापरले असेल तर, ह्याचे भाषांतर तुम्ही ‘’आणि ते तुमच्या शहरातील लोकांना ठार मारतील असे करा.

ते तुमच्यामध्ये चिर्यांवर चिरा राहू देणार नाही

ही एक अतिशयोक्ती आहे ज्याचा उपयोग शत्रू त्या दगडांनी बनलेल्या शहराचा नाश कसे करतील ह्यासाठी होतो. ह्याचे भाषांतर ‘’ते एकही दगड जागेवर ठेवणार नाहीत. (पहा: अतिशयोक्ती अलंकार)

तुम्हाला हे माहित नव्हते

‘’तुम्ही हे ओळखले नाही’’ किंवा ‘‘तुम्ही हे कबूल केले नाही’’