3.0 KiB
(योहान ख्रिस्ताबद्दल शिकवणे चालू ठेवतो.)
त्याचा पाखडण्याचा फावडा (सूप)
हा रूपक अलंकार ख्रिस्त कशा रीतीने नीतिमान आणि अनीतिमान लोकांना वेगळे करेल हे दाखवतो जसे मनुष्य भूसापासून गव्हाच्या दाण्याला बाजूला करतो. ह्याचे भाषांतर एका उपमा अलंकारात तो संबंध स्पष्ट दाखवण्यासाठी देखील करता येते: ‘’ ख्रिस्त एका मनुष्यासारखा आहे ज्याच्या हातात तो पाखडण्याचा फावडा आहे.’’ (पहा: रूपक अलंकार, उपमा अलंकार)
त्याचा पाखडण्याचा फावडा त्याच्या हातात आहे
ह्याचे भाषांतर ‘’तो तयार आहे म्हणून त्या पाखडण्याचा फावडा हातात धरून आहे.’’
पाखडण्याचा फावडा
हे साधन आहे ज्यात गहू हवेत पाखडले जातात आणि त्यामुळे गव्हातून भुसा वेगळा केला जातो. जड धान्य खाली परत पडते आणि नको असलेला भुसा हवेत उडून जातो. तो एका गावात उचलणाऱ्या उंच दांड्यासमान आहे.
त्याचे मळनीचे शेत (कोठार)
हे ठिकाण आहे जिथे लोक त्या धान्यातून भुसा वेगळा करतात. ह्याचे भाषांतर ‘’त्याचे शेत’’ किंवा ‘’जिथे तो धान्यातून भुसा वेगळा करतो.’’
त्या गव्हाला एकत्र करण्यास
ह्याचे भाषांतर देखील ‘’मग तो गहू एकत्र करेल’’ असे होऊ शकते.
कोठारे
‘’ धान्याचे कोठार’’ किंवा ‘’ धान्याचे साठे’’. नंतर वापर करण्यास ह्या ठिकाणी धान्य सुरक्षित ठेवले जाते.
त्या भूस्याला जाळून टाकणे
भुसा कशासाठीच महत्वाचा नसतो, म्हणून तो जाळण्यात येतो.