2.4 KiB
2.4 KiB
जसे लोक
जे लोक योहानाकडे आले त्यांच्याप्रत हा संदर्भ आहे. ह्याचे भाषांतर ‘’कारण ते लोक’’ असे होऊ शकते.
मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो
‘’मी पाण्याचा उपयोग करून बाप्तिस्मा देतो’’ किंवा ‘’पाण्याची मदत घेऊन मी बाप्तिस्मा देतो’’
त्याच्या पायतणांचा बंद सोडावयास मी योग्य नाही
ह्याचे भाषांतर ‘’त्याच्या पायतणांचा बंद सोडावयास देखील महत्वाचा नाही.’’ पायतणांचा बंद सोडवने एका गुलामाचे काम होते. योहान म्हणत होता की जो येणार आहे तो इतका थोर आहे की मी त्याचा गुलाम होण्यास देखील पात्र नाही.
पायतण
पायतण हे पट्ट्या असलेले बूट असतात जे बुटाच्या तळव्याला पायाशी धरून ठेवतात. ह्याचे भाषांतर ‘’बूट’’ किंवा ‘’उलट सुलट बूट’’ किंवा ‘’चामड्याची वादी’’ असे होऊ शकते.
तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल
हा रूपक अलंकार शाब्दिक प्रत्यक्ष बाप्तीसम्याची तुलना करतो ज्यात व्यक्ती पाण्याच्या संपर्कात येते ते आत्मिक बाप्तिस्मा ज्यात व्यक्ती पवित्र आत्मा आणि अग्नीच्या संपर्कात येते. (पहा: रूपक अलंकार)