mr_tn/LUK/02/06.md

3.5 KiB
Raw Blame History

ते तिकडे असताना

मरिया आणि योसेफ यरुशलेमात असताना’’

तो समय आला

‘’आता वेळ होती’’

तिचे दिवस भरले

‘’तिच्या बाळाला जन्म देण्यास. लोकांना लज्जास्पद वाटू नये म्हणून एक सामान्य पद वापरा.

त्याला बाळंत्याने गुंडाळले

ह्याचे भाषांतर ‘’अगदी आरामात त्याला एका उबदार चादरीत गुंडाळले’’ किंवा ‘’ती उबदार चादर त्याच्याभोवती नीट गुंडाळली. नवजात बालकासाठी प्रेम आणि काळजीचे हे प्रतिक होते.

जनावरांच्या कोठीब्यात (गव्हाणीत)

जनावरांना खाण्यासाठी हे एक प्रकारचा खोके किंवा पट्टी होती ज्यात चारा किंवा खाद्य ठेवण्यात येत असे. ते अगदी स्वच्छ होते आणि बाळासाठी उशी म्हणून त्यात काहीतरी मऊ आणि चार्यासारखे कोरडे साहित्य होते. जनावरांना त्या घराच्या जवळ ठेवले जात होते जेणेकरून त्यांना खाद्य सहज देता येईल आणि ते सुरक्षित राहतील. असे दिसते मरिया आणि योसेफ जनावरांना ठेवतात त्या खोलीत राहिले असतील.

पाहुण्यांची खोली

पाहुणे किंवा प्रवासी लोकांसाठी ही वेगळी खोली असते.

त्या पाहुण्यांच्या खोलीत त्यांच्यासाठी जागा नव्हती

‘’त्यांना राहण्यासाठी त्या खोलीत जागा नव्हती. हे असे होते कारण बेथलेहेमात इतके लोक नावनिशी साठी गेले होते.

कारण त्यांना जागा नव्हती

मरीयेने त्या गव्हाणीत का आपल्या बळाला ठेवले हे स्पष्ट नसेल तर, स्पष्ट करण्यास तुम्ही वचन ७ चा क्रम बदलून ते जनावरांच्या खोलीत राहत होते ह्या माहितीचे अवलंबन करू शकता. जेव्हा तिने आपल्या प्रथम पुत्राला जन्म दिला, तिने त्याला बाळंत्याने गुंडाळले. मग त्याला त्या गव्हाणीत ठेवले. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)