mr_tn/LUK/02/01.md

3.6 KiB
Raw Blame History

आता

हा शब्द दर्शवतोकी लेखक दुसऱ्या विषयाची ओळख करून देत आहे.

असे झाले की

ह्या वाक्यांशाचा उपयोग हाच वृतांताचा प्रारंभ आहे हे दाखवण्यासाठी होतो. जर तुमच्या भाषेत वृतांताच्या सुरुवातीला दर्शवण्याची पद्धत असेल, त्याचा तुम्ही उपयोग करून घ्यावा. काही भाषांतरात ह्या वाक्यांशाचा वापर करत नाही.

कैसर औगुस्त

‘’राजा औगुस्त’’ किंवा ‘’सम्राट औगुस्त. औगुस्त रोमी साम्राज्याचा पहिला सम्राट होता. (पहा: नावांचे भाषांतर)

आज्ञा फर्मान केली

एक फर्मान म्हणजे आज्ञेची जाहीर घोषणा केली. ह्याचे भाषांतर ‘’नियम’’ किंवा ‘’आज्ञांकित’’ किंवा ‘’ती आज्ञा दिली.

नावनिशी

एक नावनिशी म्हणजे एका क्षेत्रातील किंवा देशातील सर्व लोकांची नोंद करणे. त्याचा उपयोग कर गोळा करण्यासाठी करत असे.

रोमी जगातील सर्व लोकांची नावनिशी करावी

ह्याचे भाषांतर ‘’की त्यांनी रोमी विश्वातील सर्व लोकांनी नावनिशी लिहून घ्यावी’’ किंवा ‘’त्यांनी रोमी विश्वातील सर्व लोकांची गणती करून त्यांची नावे लिहून काढावी.

रोमी जग

ह्याचे भाषांतर ‘’जगाचा तो भाग ज्याचे नियंत्रण रोमी शासनाकडे आहे’’ किंवा ‘’रोमी सरदाराने शासन केलेले देश.

क्विरीनीय

सूरीयाचा सुभेदार म्हणून क्विरीनियची नियुक्ती झाली. (पहा: नावांचे भाषांतर)

सर्वजण गेले

ह्याचे भाषांतर ‘’सर्वांनी सुरुवात केली’’ किंवा ‘’सर्व लोकांनी जाण्यास सुरुवात केली.

त्याचे स्वतःचे शहर

‘’ज्या शहरात त्याचे पूर्वज राहत होते’’

नावनिशीसाठी नाव लिहून घेण्यास

’’त्या वहीत आपले नाव लिहून घेण्यासाठी’’ किंवा ‘’त्या औपचारिक मोजणीत आपला समावेश व्हावा म्हणून गेले’’