3.7 KiB
जे लोक वाईट करतात त्यांच्याशी कसे वागावे हे पौल सांगत राहतो. ह्या सत्राची सुरुवात १२:१७ मध्ये होते.
सूड घेणे माझ्याकडे आहे; मी फेड करीन’’
ह्या वाक्यांशांचा अर्थ एकच आहे आणि भर देण्यासाठी त्याचा वापर होतो. पर्यायी भाषांतर: ‘’मी नक्कीच तुमचा सूड घेईन.’’ (पहा: दुहेरी अर्थ)
तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे... तान्हेला असल्यास..... असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर........... वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक
‘’तू’’ आणि ‘’तुझा’’ ह्या सर्वांचे स्वरूप एकाच व्यक्तीला संबोधित केले गेले आहे. (पहा: तू चे स्वरूप)
पण जर तुझा शत्रू भुकेला असेल....त्याच्या मस्तकावर
१२:२० मध्ये पौल शास्त्रवचनाचा दुसरा उद्गार व्यक्त करतो. पर्यायी भाषांतर: ‘’पण असा देखील शास्त्रलेख आहे, ‘तुझा शत्रू भुकेला असल्यास........त्याचे मस्तक.’ ‘’
त्याला खावयाला दे
‘’त्याला काही अन्न दे’’
त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील
शत्रू जी शिक्षा भोगतील त्याची तुलना पौल त्यांच्या मस्तकांवर जळते निखारे ह्याच्याशी करतो. शक्य अर्थ म्हणजे १) ‘’ज्या व्यक्तीने तुम्हाला इजा पोहचवली त्याला कळू द्या की तुम्हाला त्याने किती वाईट वागवले’’ किंवा २) ‘’देवाला तुझ्या शत्रूचा कठोरपणे न्याय करण्यास आणखी एक कारण द्या.’’ (पहा: रूपक अलंकार)
वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक
पौल ‘’वाईट’’ ह्याचे वर्णन काहीतरी जिवंत असे करतो. एका कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’जे वाईट आहेत त्यांनी तुम्हाला पराजित करू नये, पण जे वाईट आहेत त्यांच्याशी चांगले वागून त्यांना पराभूत करा.’’ (पहा: मनुष्यात्वरोप आणि कर्तरी किंवा कर्मणी)