2.2 KiB
2.2 KiB
त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही
‘’जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो कधीच फजित होणार नाही.’’ ह्याचे भाषांतर एका कर्तरी क्रियापदाने होते: ‘’जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला देव फजित करणार नाही.’’ पर्यायी भाषांतर: ‘’देव त्याच्यावर विश्वास ठेवणार्यांचा सन्मान करतो.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी किंवा परिणामी नकारात्मक विधान)
यहुदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही
‘’अशा रीतीने, देव यहुदी आणि अयहुदी लोकांना समान लेखतो’’ (युडीबी).
जे त्यांचा धावा करतात त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे
‘’जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो विपुलतेने आशीर्वादित करतो’’
जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल.
‘’नाव’’ ह्या शब्दाचा संदर्भ पूर्ण व्यक्तीशी आहे. एक कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’प्रभू त्याच्यावर विश्वास ठेवणार्यांचे तारण करेल.’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार, कर्तरी किंवा कर्मणी)