3.0 KiB
देवाच्या प्रती आज्ञापालन आणि आज्ञाभंग ह्यासाठी गुलामगिरी एक रूपक अलंकर म्हणून पौल वापरतो. (पहा: रूपक अलंकार)
पण देवाला धन्यवाद असो !
‘’पण मी देवाचे आभार मानतो!
तुम्ही पापाचे गुलाम होता
येथे ‘’पापाचे’’ वर्णन जसे गुलाम मालकाची सेवा करतो तसे करतो. आणि, ‘’पाप’’ म्हणजे ते सामर्थ्य जे आपल्यात राहते आणि जे पापी आहे ते करण्यासाठी आपल्याला भाग पाडते. पर्यायी भाषांतर: ‘’पण तुम्ही पापाच्या दास्याचे गुलाम होता.’’ (पहा: मनुष्यात्वरोप आणि अजहल्लक्षण अलंकार)
पण तिचे पालन तुम्ही मनापासून केले
येथे ‘’मन’’ ह्या शब्दाचा संदर्भ काहीतरी करण्यासाठी प्रामाणिक किंवा उत्कट इच्छा देते. पर्यायी भाषांतर: ‘’पण तुम्ही खरेच आज्ञापालन केले.’’
ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले
येथे ‘’स्वरूप’’ ह्याचा संदर्भ नितीमत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे. विश्वासणारे त्यांची जुनी जगण्याची पद्धत सोडून ख्रिस्ती पुढारी शिकवतात त्या नवीन पद्धतीकडे जातात. एक कर्तरी क्रियापदाने पर्यायी भाषांतर: ‘’जी शिकवण तुम्हाला ख्रिस्ती पुढाऱ्यांनी दिली.’’ (पहा:कर्तरी किंवा कर्मणी).
तुम्ही पापापासून मुक्त झाले आहात
एक कर्तरी क्रियापदाने पर्यायी भाषांतर: ‘’ख्रिस्ताने तुम्हाला पापाच्या दास्यापासून मुक्त केले.’’
नितीमत्वाचे गुलाम
‘’जे योग्य आहे ते करण्याच्या प्रती तुम्ही गुलाम झाला आहात’’