mr_tn/ROM/01/16.md

3.3 KiB
Raw Blame History

कारण मला लाज वाटत नाही

रोम मध्ये पौलाला शुभवर्तमान का गाजवायचे होते हे तो स्पष्ट करतो.

शुभवर्तमानाची मला लाज वाटत नाही

पर्यायी भाषांतर: ‘’शुभवर्तमानाच्या बद्दल बोलत असताना मी खंबीर असतो, जरी अनेक लोक त्याचा नकार करतात. (पहा: परिणामी नकारात्मक विधान)

कारण तिच्यात

पौल अगदी खंबीरपणे का शुभवर्तमान गाजवतो हे तो स्पष्ट करत आहे.

कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे

‘’शुभवर्तमानाच्या द्वारे देव सामर्थ्याने ख्रिस्तात जे विश्वास ठेवतात त्यांचे तारण करतो.

प्रथम यहुद्याला मग हेल्लेण्याला

‘’यहुदी लोकांना’’ आणि ‘’ग्रीक लोकांना.

प्रथम

ग्रीक लोकांच्या आधी यहुदी लोकांना शुभवर्तमान गाजवले गेले, म्हणूनच येथे प्राथमिक अर्थ कदाचित १) वेळेच्या अगदी प्रथम, पण त्याचा अर्थ २)’’अगदी महत्वाने.

विश्वासाने विश्वासासाठी देवाचे नितीमत्व प्रगट झाले आहे

‘’प्रारंभापासून शेवटापर्यंत देवाने प्रगट केले की विश्वासाने लोक नीतिमान बनतात. पर्यायी भाषांतर: ‘’ज्या लोकांचा विश्वास आहे त्यांना देवाने त्याचे नितीमत्व प्रगट केले, त्याचा परिणाम म्हणजे त्यांचे विश्वास अधिक असतो’’ किंवा ‘’देव विश्वासू आहे म्हणून, तो त्यचे नितीमत्व प्रगट करतो, आणि परिणामी लोकांचा अधिक विश्वास वाढतो. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

नीतिमान विश्वासाने जगेल

‘’जे लोक देवावर विश्वास ठेवतील त्यांनाच देव त्याच्याबरोबर रास्त असे समजेल आणि, ते सर्वकाळ जगतील.